गोविंदापेक्षा माकडाला अधिक भाव, राहण्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेल; चंकी पांडेने सांगितला मजेदार किस्सा

गोविंदापेक्षा माकडाला अधिक भाव, राहण्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेल; चंकी पांडेने सांगितला मजेदार किस्सा

बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. डेविड धवन यांचा आंखे चित्रपट तर खूपच गाजला.  हा चित्रपट त्यावेळी जबरदस्त सुपरहिट झाला होता. या चित्रपटामध्ये त्या दोघांसोबत एका माकडाचीही महत्वाची भूमिका साकारली होती. त्या संदर्भात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. गोविंदा आणि चंकी पांडे पेक्षा या माकडाला या चित्रपटात काम करण्यासाठी जास्त फी मिळाली होती.

गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांनी आंखें चित्रपटात काम केले होते आणि अनेक वर्षानंतर हे तिघेही पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शो मध्ये एकत्र दिसले. यादरम्यान तिघांनी आंखें चित्रपटाच्या शूटिंगचे संबंधित अनोखे किस्से शेअर केले.  या चित्रपटामध्ये माकडाची भूमिका महत्त्वाची होती.  माकडाला त्या लोकांपेक्षाही जास्त पैसे देखील मिळाले होते असे चंकी यांनी नमूद केलं.

शक्ती कपूर म्हणाले आम्ही हा चित्रपट एकत्र केला होता ज्यात हे दोघे नायक होते. खरंतर नाही तीन नायक होते, गोविंदा, चंकी आणि एक माकड त्यांना विचारा. यानंतर चंकी पांडे म्हणाले की, हो या चित्रपटासाठी माकडाला जास्त पैसे मिळाले होते.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खास रूम

गोविंदा म्हणाला आम्हाला पैसे मिळाले नाही. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये माकडायला खोली देण्यात आल्याचे शक्तीने सांगितले. जेव्हा डेव्हिड माकडाला बोलवायचा तेव्हा चंकी यायचा आणि जेव्हा तो चंकीला हाक मारायचा तेव्हा माकड यायचा.

चंकी पांडेने केला खुलासा

मीडियाशी संवाद साधताना चंकी पांडे म्हणाले त्या माकडाला माझ्या आणि गोविंदा पेक्षा जास्त पगार दिला जात होता. तो दक्षिणेतील खूप महागडा माकड होता आणि तो माकड सहा असिस्टंट सोबत काम करायचा आणि तो एक मोठा स्टार होता जो हॉटेल सन एंड सैंड मध्ये थांबला होता. याच्यामुळे सेटवर अनेक विचित्र गोष्टी घडायच्या पण सगळ्यांचेच त्याच्यावर प्रेम होते. आंखें चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो सुपरहिट ठरला होता आणि या चित्रपटाने मोठी कमाई देखील केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;