पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा; फडणवीसांकडे अंबादास दानवेंनी मांडल्या मागण्या

पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा; फडणवीसांकडे अंबादास दानवेंनी मांडल्या मागण्या

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेचा गोंधळ बुधवारी संपला आणि गुरुवारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना शुभेच्छा देत मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा व्यक्त करत आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या आहेत.

अंबादास दानवे यांनी गुरुवारी एक्स अकाऊंटवट ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 मागण्या ठेवल्या आहेत. दानवे ट्विटमध्ये म्हणाले की, देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत आहेत. त्यांचे अभिनंदन! विरोधी पक्ष म्हणून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा त्यांच्याकडून असतील… पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून हे मराठवाड्याला मिळेल ही अपेक्षा.

1. जायकवाडी धरणाच्या कालव्यांची जलवहन क्षमता निम्म्यापेक्षा खाली गेली आहे. या कालव्यांचे पुनरुज्जीवन करून पाण्याची गळती शून्यावर आणत नासाडी रोखावी.

2. पाटबंधारे विभागात रिक्त असलेल्या पदांची सरळ भरती करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.

3. छत्रपती संभाजीनगर- नगर- पुणे ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग केवळ कागदावर नको, तो प्रत्यक्षात यावा. संभाजीनगर-नगर-पुणे या विद्यमान मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दुमजली रस्तेनिर्मिती व्हायला हवी.

4. जालना- नांदेड दरम्यान ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग निर्मितीच्या कामाचा आरंभ आणि त्याचे लोकार्पण विद्युतगतीने व्हायला हवे.

5. ऑरिक- बिडकीनच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमी अधिग्रहण आणि किमान दीड लाख कोटींची गुंतवणूक मराठवाड्यात द्यावी.

6. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपल्या आश्वासनाप्रमाणे ‘तीन महिन्यात’ शहरवासीयांना दररोज पाणी द्या. अन्यथा आंदोलनांच्या मालिकेला सामोरे जा.

7. मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकी शहरे उरली आहेत जिथे नागरिकांना दरदिवशी पाणी मिळते. मराठवाड्यातील तमाम शहरांच्या पाणीप्रश्नांवर तातडीने उपायोजना हव्यात आणि कालबाह्य पाणीपुरवठा यॊजना बाद करून नागरिकांना दरदिवशी पाणी देण्याची तजवीज करावी.

8. पर्यटकांची वाढती संख्या पाहता छत्रपती संभाजीनगरला उदयपूर, बोधगया आदी ठिकाणांशी जोडण्याकरिता विमानांची अधिक उड्डाणे द्या.

9. घृष्णेश्वर, परळी आणि औंढा नागनाथ ही ज्योतिर्लिंगे महाराष्ट्राचाच भाग आहेत. देशातील अन्य ज्योतिर्लिंग मंदिरांच्या धर्तीवर इथेही विशेष निधी देऊन विकासकामे हाती घ्यावीत.

10. विदर्भातील ‘मिहान’च्या शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांना इथे येऊन स्थलांतराच्या नावाखाली प्रलोभने देऊ नयेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;