भाजपने माफी मागावी, वादग्रस्त विधानावरून काँग्रेसची मागणी; लोकसभेत गदारोळ
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे लोकसभेत गदारोळ झाला असून दुबे यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दुबे यांनी संसदेत शुन्यकालमध्ये काँग्रेसवर आरोप केले.
दुबे संसदेत म्हणाले की विरोधी पक्ष सरकार आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षांनी परदेशातू निधी घेतला आणि मोदी सरकारविरोधात त्याचा वापर केला. OCCRP ही संस्था कुठवाही अहवाल निर्माण करते त्यावर काँग्रेस नेते लगेच ट्विट करतात. दुबे म्हणाले की राहुल गांधी यांना माझे 10 प्रश्न आहेत. भारत जोडो यात्रेत सलील शेट्टी सामील झाले होते. त्यांनी भारत जोडो यात्रेसाठी पैसे दिले होते की नाही? राहुल गांधी अमेरिकेत गेले आणि मुश्फिकल फझल यांची भेट घेतली. हे फझल बांगलादेशात झालेल्या नरसंहारासाठी जबाबदार आहेत. राहुल गांधी रो खन्ना आणि बार्बरा ली यांना भेटले ज्यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेलीत कार्यक्रमाला विरोध केला होता.
या वरून काँग्रसने भाजपवर आक्षेप घेतला. दुबे यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ झाला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List