‘बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानलाच मारयचं होतं पण’…; शूटरचा मोठा खुलासा

‘बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानलाच मारयचं होतं पण’…; शूटरचा मोठा खुलासा

अभिनेता सलमान खानच्या जीवाला अजूनही धोका आहे. त्याला आजही तेवढचं संरक्षण आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शूटरने अजून एक मोठा खुलासा केला आहे. ‘बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानला मारायचा प्लॅन होता असा धक्कादायक खुलासा आरोपीनं केला आहे.

बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानलाच मारयचा होता प्लॅन

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जीवाला सतत धोका असतो. आता जो खुलासा झाला आहे तो धक्कादायक आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शूटरने सांगितले की, सलमानला मारण्याची योजना होती पण सुरक्षेच्या कारणास्तव तो तिथे पोहोचला नाही.

सलमान खानचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. काही महिन्यांपूर्वीच सलमानचा जिवलग मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. आता बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी सलमान खानच्या हत्येचा प्लॅन समोर आला आहे.

बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये सलमान खानचे नाव आहेच

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये सलमान खानचे नाव आहेच तसेच बाबा सिद्दीकीच्या आधी सलमानला मारण्याचा प्लॅन होता पण सलमानच्या कडक सुरक्षेमुळे शूटर सलमानपर्यंत पोहोचू शकला नाही. तसेत तो सलमानला मारल्याशिवाय  बिश्नोई गप्प बसणार  नाही” असंही त्या आरोपीने म्हटलं आहे.  दरम्यान सलमानला सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याची सुरक्षाही आता वाढवण्यात आली आहे.

एक म्हणजे 4 डिसेंबर रोजी एक अनोळखी व्यक्ती सलमानच्या शूटिंग साईटवर बेकायदेशीरपणे घुसल्याची बातमी आली होती. जेव्हा तो संशयास्पद आढळला तेव्हा त्याची चौकशी केली असता तो माणूस म्हणाला “मी बिष्णोईला सांगू का?” यानंतर त्याला तातडीने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले.

दादर पश्चिम येथे सलमानचे शूटिंग सुरू होते. उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, सलमानचा एक चाहता होता ज्याला शूटिंग पाहायचे होते, सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवले तेव्हा भांडण झाले आणि त्याने रागाच्या भरात लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेतले.

काळवीट मारल्याचा राग अजूनही बिश्नोई समाजात आहे 

बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या झाली होती. या प्रकरणात सलमान खानसोबतची मैत्री हे कारण सांगण्यात आले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरामसिंग या दोन नेमबाजांना घटनास्थळावरूनच अटक केली होती. मात्र त्यानंतर मुख्य शूटर शिवकुमार गौतम पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर त्याला बहरीन जिल्ह्यातील नानपारा येथून अटक करण्यात आली. शिवने पोलीस कोठडीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येतायत त्याचं कारण म्हणजे काळवीटाची केलेली शिकार. न्यायालयाने जरी सलमानची निर्दोष मुक्तता केली असली तरी बिश्नोई समाजाकडून त्यांना अद्यापही माफी मिळालेली नाही. तेव्हापासून बिश्नोई समाजाकडून त्याच्याबद्दल द्वेश कायम आहे.

सलमान खानला धमकी देणारा आणि स्वत:ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. “सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी आणि 5 कोटी रुपये द्यावेत. त्यांनी तसे केले नाही तर आम्ही त्यांना ठार मारू, आमची टोळी अजूनही सक्रिय आहे” अशी धमकी दिली होती. . मात्र या व्यक्तीला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;