साईंच्या लाडू प्रसादातून कोट्यवधींची उलाढाल, सशुल्क आठ काऊंटरवरून दररोज 50 हजार लाडू पाकिटांची विक्री

साईंच्या लाडू प्रसादातून कोट्यवधींची उलाढाल, सशुल्क आठ काऊंटरवरून दररोज 50 हजार लाडू पाकिटांची विक्री

श्री साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून भाविकांना उदी आणि लाडूचा प्रसाद मोफत मिळतोच. मात्र, अधिकच्या लाडूसाठी संस्थानने सशुल्क आठ काऊंटर सुरू केले असून, तेथून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी कोट्यवधी भाविक शिर्डीत येतात. बाबांच्या समाधी दर्शनानंतर भाविकांना मोफत लाडू आणि उदी दिली जाते. मात्र, मोफतचा प्रसाद हा मर्यादित असतो. अधिकचा प्रसाद पाहिजे असल्यास त्यासाठी शुल्क मोजावे लागते. दर्जेदार शुद्ध तूप, बेसन, काजू, मनुके आणि इलायचीपासून 100 ग्रॅम वजनाचा प्रसाद लाडू तयार केला जातो. वीस रुपये शुल्क आकारून हा प्रसाद भाविकांना दिला जातो. सशुल्क आठ काऊंटरवरून दररोज 50 हजार लाडू पाकिटाची विक्री होत आहे. याशिवाय भाविक मागेल तितके लाडू या प्रसाद काऊंटरवरून दिले जातात. महिन्याला 15 लाख, तर वर्षाकाठी दोन कोटींपेक्षा अधिक प्रसाद लाडू विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.

शिर्डीत वर्षभर देश-विदेशातून साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात. याशिवाय विविध उत्सव आणि सणावेळी लाखोंच्या संख्येने भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी प्रसाद लाडूंना मोठी मागणी असते. त्यातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.

येणाऱ्या साईभक्तांच्या निवासाची, भोजन तसेच आरोग्य व चहापानाची व्यवस्थाही संस्थानकडून केली जाते. साईआश्रम, धर्मशाळा, द्वारकातील 1500 रूम येथून साई समाधी मंदिर आणि भोजनालयात जाण्यासाठी बस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह जवळपास चार हजार कर्मचारी अविरतपणे २४ तास भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;