गाडी आडवी घातल्याच्या कारणातून तरुणाचा खून, सातजणांना अटक

गाडी आडवी घातल्याच्या कारणातून तरुणाचा खून, सातजणांना अटक

सांगलीहून हरिपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास तरुणावर धारधार शस्त्राने तब्बल 24 वार करत निघृण खून करण्यात आला. सुरज अलिसाब सिदनाथ (वय 32, रा. पवार प्लॉट, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. केवळ गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच, सांगली ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बारा तासांत सात संशयितांना ताब्यात घेतले. यातील काही संशयित अल्पवयीन असल्याने रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

मयत सुरज सिदनाथ हा आपल्या मयत कुटुंबीयांसह शहरातील पवार प्लॉट परिसरात राहतो. सुरज सकाळी अंकली येथील वीटभट्टीवर आणि सायंकाळी हरिपूर येथे असणाऱ्या हॉटेल संगम येथे वेटरचे काम करायचा. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरज नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता. मध्यरात्री सुरज त्याच्या दुचाकीवरून घराकडे येत होता. त्यावेळी काही संशयित त्याच रस्त्यावरून हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते. त्यावेळी सुरज आणि संशयित यांच्यात गाडी आडवी मारल्याच्या कारणातून वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी सुरज यास हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ गाठले. त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी सुरज स्वतःला वाचविण्यासाठी हरिपूरच्या दिशेने पळू लागला. काही अंतरावर असणाऱ्या एका घराच्या गेटसमोर तो कोसळला. तेथे जाऊन हल्लेखोरांनी आणखी वार केले. वार वर्मी असल्याने अति रक्तस्त्रावाने सुरजचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सुरजच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता, खुनाचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच, सांगली ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

दरम्यान, संशयित हल्लेखोरातील एकाचा परिसरातील एका तरुणाशी यापूर्वी वाद झाला होता. नाजूक कारणातून हा वाद झाला होता. त्यातून त्याचा काटा काढण्याचा कट संशयितांनी रचला होता. त्याच्या शोधासाठी संशयित दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी मृत सुरजही त्याच परिसरातून निघाला होता. एकमेकांना गाडी आडवी मारण्याच्या कारणातून सुरजवर हल्ला चढवला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

हल्लेखोरांनी केले २४ वार

■ हल्लेखोरांनी सुरज याच्यावर 24 वार केले, पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तातडीने सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी खुनाची कबुलीही दिल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. खुनातील संशयितांना ग्रामीण पोलिसांसह संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चार मुले अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी एका मुलावर यापूर्वी खुनी हल्ल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे.

वेटरचा दुसरा खून

आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा हॉटेल वेटरच्या खुनाची घटना झाल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. दोन्ही खुनाच्या घटना किरकोळ वादातूनच झाल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;