लक्षवेधक – ‘पुष्पा-2’चा बुकिंगमध्ये रेकॉर्ड

लक्षवेधक – ‘पुष्पा-2’चा बुकिंगमध्ये रेकॉर्ड

2024 मधील बहुप्रतीक्षित चित्रपट पुष्पा-2 उद्या, देशभरात प्रदर्शित होत आहे, परंतु प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपल्या नावावर नवनवे रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. पुष्पा-2 ने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 21 लाखांहून अधिक तिकिटाची विक्री करून नवा रेकॉर्ड बनवला आहे. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये पुष्पा-2 ने ज्युनिअर एनटीआरच्या आरआरआरला मागे टाकले आहे. पुष्पाने प्रदर्शनाआधीच जवळपास 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

अमेरिकेत 140 चिनी कंपन्यांवर बंदी

अमेरिकेने चीनविरोधात कडक पावले उचलत चीनच्या 140 टेक कंपन्यांवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. या सर्व कंपन्या चीनमध्ये आहेत. या कंपन्या कम्प्युटर चिप्स, चिप बनवणारे उपकरण आणि सॉफ्टवेअर उपकरण बनवतात. या कंपन्यांना लायसन्स देण्यास अमेरिकेने विरोध दर्शवला आहे.

200 हून अधिक ऍप्स धोकादायक

सध्या मोबाईलवर सर्वात जास्त हल्ले हे हिंदुस्थानात होत आहेत. खासगी माहिती चोरण्यासोबतच आर्थिक गंडाही घातला जातो. गुगल प्ले स्टोअरवर 200 हून अधिक असे ऍप्स आहेत जे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. जून 2023 ते मे 2024 यादरम्यान जगभरातील सर्व मोबाईल मालवेअर हल्ल्यांपैकी सर्वाधिक 28 हल्ले हे हिंदुस्थानात झाले आहेत.

 नामिबियाच्या राष्ट्रपतीपदी महिला

आफ्रिकन देश नामिबियाच्या राष्ट्रपतीपदी नेटुम्बो नंदी नदैतवाह यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी लागली आहे. स्वातंत्र्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया नंदी नदैतवाह या आता पाचव्या राष्ट्रपती असणार आहेत. त्या सत्ताधारी पक्षाच्या आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना 57 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

 स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर करणे महाग

ऑनलाइन किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर करणे आता महाग होण्याची शक्यता आहे. कंपनी प्रत्येक ऑर्डरवर डिलिव्हरी चार्ज वाढवण्याची तयारी करत आहे. डिलिव्हरी चार्ज वेळेनुसार वाढण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीच्या सीएफओने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱया तिमाहीचे निकाल जाहीर करताना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;