मराठी लोक हरामी महाराष्ट्र तुम्हाला गुजरात्यांनी भिकेत दिला! भाजप सत्तेवर येताच उपऱ्यांची दमनशाही
मराठी लोक हरामी आहेत. महाराष्ट्राला गुजरात्यांनी घडवलेय, मराठी लोक तर मजूर आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला गुजराती लोकांनी भिकेत दिलाय, अशी गरळ गुजरातमधल्या सोहिल अश्विन शाह याने समाजमाध्यमांवर ओकली. शाहविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप सत्तेवर येताच उपऱयांची मराठी माणसांवर दमनशाही सुरू झाली आहे.
मुंबई में बीजेपी का राज आया है.. अब मराठी नहीं मारवाडी में बोलने का.. अशी मुजोरी मुंबईच्या गिरगावातील एका व्यापाऱ्याने विमल म्हसकर यांच्याकडे केल्याची घटना ताजी असतानाच समाजमाध्यमावरून गुजरातमधील सोहिल अश्विन शाह याने मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा घोर अवमान केला आहे. याविरोधात वागळे इस्टेटच्या ज्ञानेश्वरनगरातील रहिवासी अशोक जाधव यांनी थेट वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठून सोहिल अश्विन शाह याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शाहची गरळ
महाराष्ट्र बनाया है गुजरातीयोने, मराठी लोग तो लेबर है. तुम्हारे महाराष्ट्र में एक बस मुंबई ही है जिस के दम पे तुम उड रहे हो. वोह भी हम गुज्जू ने तुम्हे भीक में दी थी… हरामी साले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List