फोनचं व्यसन पडेल महागात, थेट शुक्राणूंवरच होईल परिणाम! तज्ज्ञांचा इशारा

फोनचं व्यसन पडेल महागात, थेट शुक्राणूंवरच होईल परिणाम! तज्ज्ञांचा इशारा

फोनच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या शुक्राणूवर गंभीर परिणाम होतोय. ज्यामुळे मूल न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते आहे.

आजकाल स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज इंटरनेटच्या जमान्यात माणूस तासंतास सोशल मीडियावर घालवत आहे. अनेकांना तर दर पाच मिनीटाला फोनवर रिल्स स्क्रोल करण्याची सवय झाली आहे. तर काही लोकांना या मोबाईलमुळे कसलेही भान राहिले नाही. मोबाईलचे हे व्यसन तुम्हाला गंभीर आरोग्याकडे नेत आहे.  फोनच्या या व्यसनामुळे व्यक्तीच्या शुक्राणूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मूल न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात

पालक होऊ न शकण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची कमतरता. जीवनशैली आणि पर्यावरणीय अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. जास्त ताण, झोप न लागणे, दारू, तंबाखू, विडी, सिगारेटचे सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. याशिवाय मोबाईल रेडिएशनच्या संपर्कात जास्त वेळ घालवल्याने शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या यावरही परिणाम होतो.

पुरुषांना शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर सर्वप्रथम त्यांना या वाईट सवयी सोडून द्याव्या लागतील. अल्कोहोल आणि तंबाखू सारख्या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे आणि आपली जीवनशैली सुधारणे खूप महत्वाचे आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे शुक्राणूंची संख्या वाढवण्यात महत्त्वाचे योगदान असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. तसेच रोजचा व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते, असे तज्ज्ञ म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;