ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने सांगितला आयुष्यातील ‘तो’ वाईट काळ;म्हणाला “मी डिप्रेशनमध्ये होतो…”

ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडने सांगितला आयुष्यातील ‘तो’ वाईट काळ;म्हणाला “मी डिप्रेशनमध्ये होतो…”

ऐश्वर्या रायचे नाव तसे बऱ्याच कलाकारांबरोबर जोडले गेले होते.पण त्यातील एक कलाकार ज्याचे करिअरच जवळपास संपले होते. तो म्हणजे ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉय. एका मुलाखतीत विवेकने त्याच्या करिअरमध्ये आलेला तो वाईट काळ सांगितला. त्यामुळे आता त्याला चित्रपटसृष्टीचीच भिती वाटत असल्याचे म्हटले आहे.

हा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय. विवेक ओबेरॉयच्या अभिनयाबद्दल लोकांनी अनेकदा कौतुक केलं आहे. पण त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची हवी तशी आणि तितकी संधी मिळाली नाही. एका पॉडकास्ट दरम्यान, त्याला काम मिळत नसल्याने आलेल्या डिप्रेशनबद्दल सांगितले होते.

विवेक ओबेरॉयचे म्हणणे आहे की, फिल्म इंडस्ट्री खूपच असुरक्षित आहे. 2007 मध्ये त्याला त्याच्या एका चित्रपटासाठी पुरस्कार मिळूनसुद्धा हव्या तशा ऑफर्स येत नव्हत्या. जवळपास 15 महिने त्याच्याकडे काम नसल्याचं त्याने सांगितले. अखेर त्याने काहीतरी व्यवसाय करायचं ठरवल्याचे त्याने सांगितले.

फिल्म इंडस्ट्री असुरक्षित

एका मुलाखतीत विवेक म्हणाला, “मी 22 वर्षात जवळपास 67 प्रोजेक्ट केले आहेत पण तरीही हे म्हणावसं वाटतं की, इंडस्ट्री खूप असुरक्षित आहे. तुम्ही चांगली कामगिरी करत आहात, पुरस्कार जिंकत आहात आणि एक अभिनेता म्हणून तुमचे कौतुकही होत आहे,मात्र त्याच वेळी तुम्हाला इतर काही कारणांमुळे काम मिळणे बंद होते.

“15 महिने काम नव्हते, डिप्रेशनमध्ये होतो.”

पुढे विवेक म्हणाला, ‘मी 2007 मध्ये लोखंडवाला चित्रपट शूट केला तेव्हा ‘गणपत’ हे गाणे व्हायरल झालं होतं. त्यानंतर मला बऱ्याच ऑफर्सची अपेक्षा होती, पण मला काहीच मिळाले नाही.

चित्रपटाच्या यशानंतर मी 14 ते 15 महिने घरी बसलो. मला अनेक गोष्टींची काळजी वाटत होती. मी खूप तणावात होतो” असं म्हणत त्याने त्याच्या करिअरचा तो वाईट काळ सांगितला.

विवेकने सांगितले की व्यवसाय हा नेहमीच त्याच्यासाठी प्लॅन बी होता. “सिनेमा ही माझी आवड असेल आणि मी व्यवसायातून माझा उदरनिर्वाह करेन, असं मी ठरवले. यामुळे मला स्वातंत्र्य मिळालं आणि मी लॉबीच्या जाळ्यातून बाहेरही आलो. माझा आत्मा विकणे किंवा कोणाची खुशामत करणे हे माझ्यासाठी जगण्याचा मार्ग नव्हता. काही लोक यातून उपजीविका करतात पण मी नाही.’ असं म्हणतं काम मिळण्यासाठी कोणाची विनवी करण्यापेक्षा व्यवसाय करणे पसंत असल्याचे विवेकने म्हटलं.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;