नांदेडमध्ये पहाटे अग्नितांडव; अग्निशमन दलाचे पथक वेळीच घटनास्थळी दाखल, हॉस्टेलमधील अनेक मुलींचा जीव वाचला

नांदेडमध्ये पहाटे अग्नितांडव; अग्निशमन दलाचे पथक वेळीच घटनास्थळी दाखल, हॉस्टेलमधील अनेक मुलींचा जीव वाचला

नांदेड शहरातील आनंदनगर भागात आज भल्या पहाटे मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी आणि ऑईल शोरुम जळाले आहे. अग्निशमन दलाचे पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे हॉस्टेलमधील अनेक मुलींचे जीव वाचले आहे. मात्र दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नांदेड शहरात आनंदनगर भागात नैवेद्यम हॉटेल, जीव्हीसी मोबाईल शॉपीला सुरुवातीला आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले. नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी या मुलींच्या हॉस्टेललाही आगीने वेढा घातला. तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान वेळेवर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्वप्रथम हॉस्टेलमधील सर्व 70 मुलींना सुखरुप बाहेर काढले. या आगीत नैवेद्यम हॉटेल, जीव्हीसी मोबाईल शॉपी जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोबाईल शॉपीच्या डाव्या बाजूस श्री महालक्ष्मी ऑईल शोरुमचे मोठे दुकान होते. या दुकानाच्या शटर व समोरील सिलींगला मोठी आग लागली. मोबाईल शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे व शटर पूर्णतः जळाले, तर हॉटेलचेही मोठे नुकसान झाले. महालक्ष्मी ऑईल शोरुमच्या समोरच्या भागाला मोठी आग लागल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले.

या आगीत जवळपास 40 ते 50 लक्ष रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे व त्यांच्या सहकार्‍यांनी तीन तासातच या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी अशी शंका व्यक्त होत आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत संबंधित दुकानदारांनी तक्रार दिली आहे. भल्या पहाटे लागलेल्या या आगीमुळे आजूबाजूची मंडळी देखील घाबरुन गेली. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्याने जिवीतहानी झाली नाही. नांदेड शहर शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे शहर असून, याच आनंदनगर, बाबानगर व भाग्यनगर भागात मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस आहेत. नांदेड शहरात बाहेरुन येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नांदेडमधील हॉस्टेलची सुरक्षितता रामभरोसे असून, घरगुती मंडळी देखील आता विनापरवाना हॉस्टेल चालवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्त नांदेडमध्ये रहायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;