आईच्या पार्थिवाला मुलीने दिली भडाग्नी, अहमदपूर तालुक्यातील रूध्दा येथील घटना

आईच्या पार्थिवाला मुलीने दिली भडाग्नी, अहमदपूर तालुक्यातील रूध्दा येथील घटना

पुरुष प्रधान संस्कृतीत मुलांना मुली पेक्षा जास्त महत्व दिले जाते मात्र ही बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चालली आहे या परंपंरेला छेद देत मुलींनी आईच्या पार्थीवाला भडाग्नी दिला. तालुक्यातील रूध्दा येथे वृध्दपकाळाने निधन झालेल्या आईच्या चित्तेस मुलीने भडाग्नी दिला असून समाजातील अनिष्ट, रूढी परंपरेला छेद देत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

या बाबत घडलेली घटना अशी की शेन्नी ता.अहमदपूर येथील मुळ रहिवाशी असलेल्या पण रूध्दा ता.अहमदपूर येथे लेकीकडे वास्तव्यास असलेल्या सुगंधाबाई किशनराव गीत्ते या वृध्द महिलेचे वयाच्या 110 व्या वर्षी वृध्दपकाळाने 28 नोव्हेंबर रोजी निधन झाले. सुगंधाबाई किशनराव गीत्ते यांना 2 मुले व 6 मुले आहेत पण बर्‍याच वर्षांपासून रूध्दा येथील सुंदरबाई ज्ञानोबा नागरगोजे या मुलींकडे बर्‍याच वर्षांपासून त्या राहत होत्या. त्यांच्या म्हातारपणात पालन-पोषणाची जबाबदारी त्यांनीच पार पाडली होती. 28 नोव्हेंबर रोजी वृध्दपकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यावर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली.घरापासून स्मशानभूमी पर्यंत सुंदरबाई ज्ञानोबा नागरगोजे यांनी हातात मडके घेत धीरोदात्तपणे वाटचाल सुरू करीत आपल्या आईस भडाग्नी देऊन अंतीम संस्काराचे सोपस्कार पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;