गोविंदाची लेक टीना गंभीर आजाराच्या विळख्यात, म्हणाली, ‘स्वतःला मारायची कारण…’

गोविंदाची लेक टीना गंभीर आजाराच्या विळख्यात, म्हणाली, ‘स्वतःला मारायची कारण…’

Govinda Daughter Tine Ahuja: अभिनेता गोविंदा याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही गोविंदाची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. गोविंदाची प्रसिद्धी आणि लोकप्रियता अधिक असल्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबियांबद्दल देखील अनेक चर्चा रंगत असतात. सध्या गोविंदा यांची मुलगी टीना आहूजा तिच्या आजारामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, टीने हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.

दरम्यान, एका मुलाखतीत टीना हिने स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला. टीनाने सांगितलं होतं की, Nerve Spasm (स्नायूंना आकडी) मुळे वजन वाढू लागलं होतं. दोन वर्षांपूर्वी टीना हिचा अपघात झाला होता. या अपघातानंतर अभिनेत्रीने अनेक अडचणींचा सामना केला. अपघातानंतर टीना हिचं वजन वाढू लागलं. अचानक शरीरात होणार बदल पाहून टीना हिला समस्यांचा सामना करणं कठीण जात होतं. अभिनेत्रीची 24 इंच कंबर यूके साइज 10 झाली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Ahuja🧸 (@tina.ahuja)

 

टीना म्हणाली, ‘मी वडिलांसमोर ढसा-ढसा रडत होती. मी सतत विचार करायची मला काय होत आहे. माझं वजन वाढत होतं. आजारामुळे नैराश्य, तणाव यांसारख्या अडचणी डोकं वर काढत होत्या. अशात मी दिवसभर स्वतःला मारायची… स्ट्रिक्ट डायट करायची… ज्यामुळे माझ्यात अनेक बदल झाले…’

‘मी अद्यापही आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता मी आनंदी आहे. पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे…’ असं देखील गोविंदाची लेक टीना म्हणाली. टीना लाईमलाईटपासून दूर असली तरी गोविंदाची मुलगी असल्यामुळे कायम चर्चेत असते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Ahuja🧸 (@tina.ahuja)

 

टीना हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, टीना हिने ‘सेकंड हँड हसबँड’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करू शकला नाही. टीनाचा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरला… त्यानंतर टीना ‘थिंकिस्तान’ या सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीस आली. त्यानंतर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैयाजी सुपरहीट’ मधून देखील टीना चाहत्यांच्या भेटीस आली. पण टीना बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करु शकली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;