‘पुष्पा 2’ची रिलीजपूर्वी 100 कोटींची अ‍ॅडवान्स बुकिंग, सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला सेंसर बोर्डाचा हिरवा कंदील

‘पुष्पा 2’ची रिलीजपूर्वी 100 कोटींची अ‍ॅडवान्स बुकिंग, सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला सेंसर बोर्डाचा हिरवा कंदील

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2′ रिलीय व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. सिनेमाला रिलीज व्हायला 48 तास बाकी असूनही या सिनेमाने मोठेमोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सिनेमाने रिलीजपूर्वीच 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सिनेमाचे 3डी व्हर्जन 5 डिसेंबरला रिलीज केला जाणार नाही. दरम्यान ‘पुष्पा 2’ च्या हिंदी व्हर्जनला सेंसर बोर्डानेहिरवा कंदील दाखवला आहे.

मागच्या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी ‘पुष्पा 2’च्या तेलगू व्हर्जनला सीबीएफसीने पास केले होते. सिनेमाचा वेळ आधीच चर्चेचा विषय बनलेला आहे. या दरम्यान सिनेमाचे काही कट्सही लावण्यात आले आहेत. तेलगूनंतर सिनेमाच्या हिंदी व्हर्जनालाही हिरवा झेंडा मिळालेला आहे. नुकतीच बॉलीवूड हंगामामध्ये एक रिपोर्ट आला होता. त्यात हिंदी व्हर्जनला काही कट्स लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये 3 ठिकाणी आक्षेपार्ह असलेली भाषा बदलली आहे, ज्या सीनला तेलगूमधून हटविण्यात आले असून आता हिंदी व्हर्जनमधूनही हटविण्यात आले आहे.

शिवाय सिनेमात जिथे जिथे सिगारेट ओढळ्याचा सीन आहे. तिथे अ‍ॅण्टी स्मोकिंग सीन आहेत, तिथे स्मोकिंग वॉर्निंग टाकायला सांगितले आहे. खरंतर सिनेमात फारसे काही बदल झालेले नाहीत. छोटे-छोटे कट्स होते ज्यात बदल करुन सिनेमा पास करण्यात आला, विशेष म्हणजे या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वी जगभरातून 100 कोटींची अ‍ॅडवान्स बुकिंग केली आहे.. हा आकडा फार मोठा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;