गडकरींचा आसन क्रमांक 58 वरून पुन्हा 4 वर, वाद टाळण्यासाठी आसनव्यवस्था पूर्ववत केल्याची चर्चा

गडकरींचा आसन क्रमांक 58 वरून पुन्हा 4 वर, वाद टाळण्यासाठी आसनव्यवस्था पूर्ववत केल्याची चर्चा

लोकसभा सदस्यांची आसन व्यवस्था आणि क्रमांक निश्चित करण्यात आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहिल्या ब्लॉकमध्ये चौथ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शेजारी जागा देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांची जागा दुसऱ्या ब्लॉकमधील पहिल्या रांगेत आसन क्रमांक 58 होता. आता त्यात बदल करण्यात आला असून त्यांचा आसन क्रमांक 4 वर आला आहे.

मोदी सरकारमध्ये मंत्रीपद आणि ज्येष्ठत्वाच्या आधारे गडकरी नेहमीच लोकसभेत पहिल्या ब्लॉकच्या पहिल्या रांगेत शहांच्या शेजारी बसतात. परंतु, नव्या रचनेत लोकसभा अध्यक्षांनी गडकरींना दुसऱ्या ब्लॉकमध्ये आसन दिले होते आणि शहांच्या शेजारील 4 क्रमांकाचे आसन रिक्त ठेवले होते. हे आसन भाजपच्या नव्या पक्षाध्यक्षांसाठी राखीव ठेवले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, या रचनेमुळे गडकरींचे ज्येष्ठत्व नाकारले गेले गेल्याचे चित्र निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगत लगेचच आसन व्यवस्था पूर्ववत करण्यात आल्याचे सांगितले जाते.

बदल चुकून की जाणुनबूजन

लोकसभेतील नवी आसनव्यवस्था 29 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. परंतु, दोनच दिवसांत संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी लगेचच त्यात बदल करण्यात आले. गडकरी यांना पुन्हा चौथ्या क्रमांकाचे आसन बहाल करण्यात आले. त्यानंतर आता हा बदल चुकून झाला होता की जाणूनबुजून केला होता याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;