सातरस्ता येथे तस्कराच्या घरातून 38 किलो गांजा पकडला, गुन्हे शाखेची कारवाई

सातरस्ता येथे तस्कराच्या घरातून 38 किलो गांजा पकडला, गुन्हे शाखेची कारवाई

परिसरातील नशेबाजांना गांजाची विक्री करणाऱया एका ड्रग्ज तस्कराला मुंबई गुन्हे शाखेने पकडले. सातरस्ता येथे कारवाई करत पोलिसांनी तस्कराच्या घरातून 38 किलो 117 ग्रॅम वजनाचा व नऊ लाख 52 हजार किंमतीचा गांजाचा साठा हस्तगत केला. सातरस्ता येथील विठ्ठल निवास येथे राहणाऱया एका 27 वर्षीय तरुणाने त्याच्या घरात मोठय़ा प्रमाणात गांजाचा साठा करून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-4 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक लता सुतार, निरीक्षक नितीन पुंभार व पथकाने त्या तरुणाच्या घरावर धडक दिली. घराची झडती घेतली असता तेथे 38 किलो 117 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. त्या तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

छोटय़ा पुडय़ांमधून गांजाची विक्री

अटक केलेला तरुण छोटय़ा पुडय़ांमधून नशेबाजांना गांजाची विक्री करतो. गेल्या एक वर्षापासून तो गांजाविक्रीचा धंदा करत असल्याचे समोर आले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;