तेव्हा स्वार्थासाठीही मी तो निर्णय घेतला नाही, तर आता कशाला घेईन; वैभव नाईक यांनी केली भूमिका स्पष्ट

तेव्हा स्वार्थासाठीही मी तो निर्णय घेतला नाही, तर आता कशाला घेईन; वैभव नाईक यांनी केली भूमिका स्पष्ट

विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी अपार कष्ट केले. आपण सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली म्हणून आपल्याला 73000 मतांपर्यंत मजल मारता आली. मी सामान्य माणसांचा लोकप्रतिनिधी होतो. आणि सर्व सामान्य नागरिक,कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळे पुढील काळात आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढ काम मी करणार आहे. शेवटचा माणूस जोपर्यंत माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय, तोपर्यंत मला काम करायचे आहे. ज्याप्रमाणे मी निष्ठावंत राहिलो त्याप्रमाणे आपण सर्व शिवसैनिक निष्ठावंत राहिलात. तुमचा विश्वासघात मी करणार नाही. लोक सवाल करतात, आता मी कोणता निर्णय घेणार ? तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन? हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असे सांगत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे आपली भूमिका स्पष्ट केली.

मालवण तालुका शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बैठक मंगळवारी कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे झाली. कुडाळ प्रमाणेच मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बैठकीला लाभला होता. वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा निश्चय यावेळी मालवण शिवसेनेने घेतला. यावेळी
वैभव नाईक म्हणाले, पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. सत्ताधारी आणि अधिकारी यांच्याकडून जेव्हा जेव्हा चुकीचं घडेल तेव्हा विरोधक म्हणून आपल्याला तीव्र विरोध केला पाहिजे. लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. भावना सर्वांच्याच असतात पण भावना बाजूला ठेवून काम करावे लागणार आहे.

निवडणुकीत मला नुसता विजय मिळवायचा असता तर भरतशेठ गोगावले यांचा दसऱ्याच्या दिवशी मला फोन आला होता ते म्हणाले तुम्ही अजूनही आमच्याकडून निवडणूक लढवा. मग समोरच्या उमेदवाराचा प्रवेश ते घेणार नव्हते. परंतु मला निष्ठेने विजय मिळवायचा होता. ज्याप्रमाणे मी निष्ठावंत राहिलो त्याप्रमाणे आपण सर्व शिवसैनिक निष्ठावंत राहिलात. तुमचा विश्वासघात मी करणार नाही. लोक म्हणतात आता मी कोणता निर्णय घेणार मात्र तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन. माझ्या विरोधात निवडून आलेल्या उमेदवाराला मी तेव्हाच शुभेच्छा दिल्या. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी विकास कामे करून दाखवावीत. हे करत असताना सत्ताधारी आणि अधिकारी यांनी एक लक्षात ठेवावे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून कामे केल्यास आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही. हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू.माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे, अशी ठाम भूमिका वैभव नाईक यांनी मांडली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते , मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी,नितीन वाळके,यतीन खोत, बाबी जोगी,मंदार गावडे,मंदार ओरसकर,संमेश परब, पूनम चव्हाण,दीपा शिंदे,श्वेता सावंत, सेजल परब,देवयानी मसुरकर,मीनाक्षी शिंदे , बाबा सावंत, उमेश मांजरेकर,किरण वाळके,नंदू गवंडी,बाळ महभोज,उदय दुखंडे ,भाऊ चव्हाण,अमोल वस्त,पंकज वर्दम,नंदू गावडे,मंगेश टेमकर,पराग नार्वेकर,विनायक परब,गणेश कुडाळकर,रश्मी परुळेकर,अमित भोगले,राजेश गावकर,समीर लब्दे,विजय पालव,भगवान लुडबे,बंडू चव्हाण,अनिल गावकर,श्रीकांत बागवे,महेंद्र म्हाडगुत,मनोज मोंडकर,तपस्वी मयेकर,अक्षय रेवंडकर,पीयूष चव्हाण,रूपा कुडाळकर,भाऊ चव्हाण,आर्या गावकर,रीमा पारकर,प्रियांका रेवंडकर,स्वप्नील पुजारे,अरुण लाड,अनुष्का गावकर,निना मुंबरकर, तेजस लुडबे यांसह विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी,शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;