भाजपचा कारभार म्हणजे वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत, अनंत गाडगीळ यांचा टोमणा

भाजपचा कारभार म्हणजे वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत, अनंत गाडगीळ यांचा टोमणा

सरकार स्थापनेवरून राज्यात महायुतीचा मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. यावरच आता काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी टीका केली आहे. अनंत गाडगीळ म्हणाले आहेत की, ”विधानसभेच्या निवडणूका होऊन 10 दिवस उलटले तरी अजूनही भाजप नेता निवडू शकलेली नाही. लोकशाही प्रथेप्रमाणे निकालांनंतर बहुमतवाला पक्ष नेता निवड करतो. त्यांनतर सदर नेता राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा पुरावा देतो. त्या अनुषंगाने राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करतात व त्यांनतर शपथविधी होतो.”

अनंत गाडगीळ म्हणाले की, ”महाराष्ट्रात प्रथा तर सोडाच पण ही प्रक्रियाही सुरु होण्यापूर्वीच भाजपचेच अध्यक्ष शपथविधीची तारीख जाहीर करतात. यातून एकाधिकारीशाही, संविधानाची पायमल्ली, लोकशाही प्रथांचे विसर्जन याचे प्रतिबिंब दिसून येते. ही देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे.”

भाजपचा गेल्या आठ दिवसातील कारभार म्हणजे हॉल बुक केला आहे. म्हणून आता वधू वर शोधायचा, “जावई निवडीपूर्वीच रुसलेले” अशातला प्रकार असल्याची उपरोधक टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;