मॉलमध्ये फरशी पुसणारी मुलगी शाहरुख खानमुळे सुपरस्टार; एका चित्रपटामुळे नशिबच बदललं

मॉलमध्ये फरशी पुसणारी मुलगी शाहरुख खानमुळे सुपरस्टार; एका चित्रपटामुळे नशिबच बदललं

बॉलिवूडमध्ये असणाऱ्या किंवा नव्याने आलेल्या कलाकारांचे स्ट्रगल आणि त्यांनी मिळवलेल्या मेहनतीची नेहमीच चर्चा असते. कित्येक कलाकारांनी मुलाखतींमध्ये त्यांचे स्ट्रगलिंग दिवसांचे अनुभव सांगितले आहेत. काहींनी तर त्यांच्या स्ट्रगल काळात हॉटेलमध्ये, मॉलमध्ये काम केले आहे. त्यात अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे पाहायला मिळतील. असच एक नाव आहे एका अभिनेत्रीचं जिने तिच्या स्ट्रगल काळात छोटी-मोठी काम केले अन् आज ती मोठी सुपरस्टार आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर ही अभिनेत्री मॉलमध्ये क्लिनिंगचे काम करत होती. म्हणजे मॉलमध्ये फरशी पुसणे, टॉयलेट स्वच्छ करणे पण तिने हे करत फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिचं नशीब आजमावत होती. तिच्या नशिबाने आणि तिच्या मेहनतीने तिची साथ दिली आणि ती मुलगी थेट शाहरुख खानच्या चित्रपटात झळकली.

एका संधीने आयुष्य बदललं

ही अभिनेत्री आहे माहिरा खान. माहिरा एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिच्या नशिबाने तिला बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसोबत एक चित्रपट करण्याची संधी मिळाली आणि तिचे दिवस पलटले. कोणाचं नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही त्यासाठी एक संधीदेखील पुरेशी असते. असाच काहीसा प्रकार माहिरा खानसोबत घडला. माहिराने पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटाद्वारे 2017 मध्ये तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. माहिरा आता पाकिस्तानातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे.मात्र, इथपर्यंतचा तिचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. माहिरा आज भारतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच पाकिस्तानातील पंजाबी चित्रपटसृष्टीतील पहिला 100 कोटी रुपयांचा चित्रपट देणारीही माहिराच आहे.

एकेकाळी टॉयलेटची स्वच्छता, मॉलमध्ये फरशी पुसणं अशी कामे केली 

चित्रपटसृष्टीतील करिअर सुरू होण्याआधी तिनं एका रेस्टॉरंटमध्ये काम केलं होतं. तसंच अमेरिकेत असताना टॉयलेटची स्वच्छता, मॉलमध्ये फरशी पुसणं ही कामंही तिने केली होती.ती 17 वर्षांची असताना उच्चशिक्षणासाठी कॅलिफोर्नियामध्ये गेली होती. तिथे तिला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. एका मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं त्याबाबत सांगितलं, की “माझ्या जीवनात खडतर काळही आला होता, हे लोकांना माहीत व्हावं असं मला वाटतं. त्या काळात मी फरशी पुसण्याचं काम केलं. लॉस एंजेलिसमध्ये त्यावेळी मी टॉयलेट स्वच्छतेचं कामही केलं आहे.”

माहिराने पुढे सांगितले की, तिनं आणि तिच्या भावानं एका डॉलरमध्ये जेवण घेऊन ते वाटून खाल्लं होतं. “हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. लोक मी विनम्र आहे असं म्हणतात, पण मला आलेल्या अनुभवांमुळे मी तशी झाले.”अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी माधुरी दीक्षितकडून प्रेरणा मिळाल्याचं दुसऱ्या एका मुलाखतीत तिनं म्हटलं होतं. माधुरीच्या ‘धक धक करने लगा’ या सुपरहिट गाण्यामुळेच तिनं अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतल्याचं माहिराने सांगितले.

पाकिस्तानात तसंच आता भारतातही ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. मोठ्या संघर्षाने इथपर्यंत पोहोचलेल्या माहिराची आज 58 कोटी रुपयांची संपत्ती आहे. माहिराचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी किंवा या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहाणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;