‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अनुष्कामुळे आदित्य-पारूच्या नात्यात येणार कायमचा दुरावा?
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. 'पारू' या मालिकेत अनुष्काच्या एण्ट्रीनंतर आदित्य आणि पारूच्या मैत्रीत दुरावा निर्माण झालाय. आता तर अनुष्का आदित्यसाठी डेट नाईट प्लॅन करत आहे.
आदित्यसोबतच्या डेट नाईटची तयारी अनुष्काने पारूला करायला सांगितली आहे. अनुष्का तिची योजना यशस्वी झाल्यानंतर दिशाला भेटायला जाते. इथे तिचं दिशासोबतचं नातं उलगडतं आणि तिचा किर्लोस्कर कुटुंबामध्ये येण्यामागचा खरा उद्देश स्पष्ट होतो.
अनुष्का आता किर्लोस्कर कुटुंबाचा भाग बनू पाहतेय, तर पारू आदित्य आणि संपूर्ण कुटुंबापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करतेय. दरम्यान, आदित्यला उद्योग क्षेत्रातील विशेष पुरस्कार जाहीर झालाय, यामुळे पारू खूप आनंदात आहे. मात्र, जेव्हा ती आदित्यला शुभेच्छा देण्यासाठी जाते, तेव्हा आदित्य आणि अनुष्काला एकत्र पाहून ती निराश होते.
दुसरीकडे, दामिनी मारुतीला सांगतेय की गरीब मुली श्रीमंत मुलांना कसं फसवतात? त्यामुळे ती मारुतीला पारूला किर्लोस्कर कुटुंबापासून दूर ठेवण्याचा सल्ला देते. पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी पारू आदित्यची बॅग पॅक करते, तेव्हाच ती त्याच्या जॅकेटचा उबदारपणा अनुभवायचा प्रयत्न करते.
अनुष्का हे सर्व पाहते आणि खूप संतापते. अनुष्का पारूच्या वागणुकीमुळे चिडते आणि तिचा बदला घेण्याचा मार्ग शोधते. ती आदित्यला पारूला फक्त नोकर म्हणायला लावते. हे ऐकून पारू खूप दुःखी होते. त्यामुळे पारू आदित्यपासून आणि किर्लोस्कर कुटुंबापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेते.
याच दरम्यान प्रीतम जाहीर करतो की आदित्य आणि पारूला एका जाहिरातीसाठी एकत्र काम करावं लागेल. ज्यामध्ये गावात जाऊन प्रमोशनल व्हिडिओ शूट करणं अपेक्षित आहे. सर्वजण यासाठी सहमती देतात, पण पारू नकार देते. दामिनीच्या धमकीमुळे मारुतीही पारूला या शूटसाठी पाठवण्यास नकार देतो आणि तिला किर्लोस्कर कुटुंबापासून दूर ठेवतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List