भगवे वस्त्र, कपाळावर टिळा लावणे टाळा; इस्कॉनने बांगलादेशी हिंदूंना दिला सल्ला

भगवे वस्त्र, कपाळावर टिळा लावणे टाळा; इस्कॉनने बांगलादेशी हिंदूंना दिला सल्ला

बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत असून आता इस्कॉनशी जोडलेल्या लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नेते आणि इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर इस्कॉनच्या अनुयायांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यात भगवे वस्त्र आणि कपाळावर टिळा लावल्याने या अनुयायांना सहज ओळखता येते. अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कोलकाताच्या इस्कॉनने आपल्या अनुयायांना भगवे वस्त्र आणि कपाळाला टिळा लावण्याचे टाळावे असा सल्ला दिला आहे.

बांगलादेशातील सध्याची तणावग्रस्त परिस्थिती पाहता संघर्ष टाळण्यासाठी लोकांनी भगव्या रंगाचे कपडे घालणे टाळावे, तुळशीची जपमाळ लपवावी, टिळक पुसावे आणि डोके झाकावे, असे इस्कॉन कोलकात्याने आपल्या अनुयानांना सल्ला दिला आहे. मंदिर आणि घरांमध्येच आपल्या धर्माचे पालन करा. बाहेर निघताना सावधता बाळगा. मी सर्व संत आणि सदस्यांना सल्ला देतो की, संकटाच्या या काळात सावध राहा. भगवे कपडे आणि कपाळावर टिळा लावणे टाळा असा सल्ला दिला असल्याचे इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले. पुढे ते म्हणाले,  जर भगवा धागा घालण्याची इच्छा असेल तर तो धागा कपड्यांच्या आत लपवावे. तो धागा गळ्यात दिसू नये. शक्य असल्यास तुमचे डोकेही झाका, शक्य तो सर्व प्रयत्न करा ज्याने तुम्ही साधू असल्याचे ओळखता येणार नाही असा सल्ला दिला.

दास म्हणाले की, गेल्या आठवड्यात अनेक संत आणि इस्कॉन सदस्यांना सर्वांसमोर धमक्या देण्यात आल्या. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. इस्कॉनच्या सुमारे 63 संतांना बांगलादेश इमिग्रेशनने शनिवार-रविवारी हिंदुस्थानात येण्यापासून रोखले. त्या सर्वांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती.

बांगलादेशमध्ये हिंदू नेते आणि इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर इस्कॉनच्या अनुयायांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यांना औषध देण्यासाठी गेलेल्या त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;