अभिनेत्याने रंगमंचावरच डुकराचे पोट फाडले आणि…..पोलिसांनी केली अटक

अभिनेत्याने रंगमंचावरच डुकराचे पोट फाडले आणि…..पोलिसांनी केली अटक

ओडीशामधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. ओडिशाच्या एका अभिनेत्याने रंगमंचावर जिवंत डुकराचे पोट फाडून असे काही केले की, थेट पोलिसांनी त्याला अटक केले. या घटनेमुळे ओडीशात खळबळ उडाली आहे. सोमवारी विधान सभेतही अभिनेत्याच्या या कृतीचा निषेध करण्यात आला.

ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात रामायणातील राक्षसाची भूमिका साकारणाऱ्या 45 वर्षीय बिंबधर गौडा या थिएटर अभिनेत्याने रंगमंचावर जिवंत डुकराचे पोट फाडून त्याचे मांस खाल्ल्याने त्याला अटक केली आहे. या व्यतिरिक्त, हिंजली पोलीस स्टेशन हद्दीतील रालाब गावात 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या नाटकाच्या आयोजकांपैकी एकाला देखील प्राण्यांवर क्रूरता आणि वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

बेहरामपुरचे प्रभागीय वनअधिकारी सनी खोखर म्हणाले की, आम्ही त्या लोकांचाही शोध घेत आहोत ज्यांनी थिएटरमध्ये साप दाखवले होते. त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल. पोलिसांनी अटक केलेल्या आयोजकाचे नाव सांगितलेले नाही. राज्य सरकारने गतवर्षी जारी केलेल्या नियमांमध्ये सापांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी घातली होती. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी या अभिनेत्या खराखुरा अभिनय वाटण्यासाठी त्या प्राण्याला मारले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;