एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळलं; अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अटक
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिची बहीण आलिया हिला अमेरिकेमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळण्याचा आरोप तिच्यावर आहे. याच दुहेरी हत्याकांडाप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात आलिया हिने न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे एका गॅरेजला आग लावली होती. या आगीमध्ये जळून तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स (वय – 35) आणि त्याची मैत्रीण अॅनास्तेसिया स्टार एटीन (वय – 33) हिचा मृत्यू झाला होता. ईर्ष्येच्या भावनेतून आलिया हिने हे कृत्य केले होते. आता याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List