आचऱ्यात 15 डिसेंबरला ‘गावपळण’, तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर

आचऱ्यात 15 डिसेंबरला ‘गावपळण’, तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर

बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतीक्षा असलेली संस्थान आचरे गावची ‘गावपळण’ सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15 डिसेंबरला ‘गावपळण’ होणार असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.

दर चार ते पाच वर्षांनी गावपळणीचे वर्ष आल्यावर देवदिवाळीला बारापाच मानकरी दुपारी रामेश्वर मंदिरात जमून गावपळणीचा रामेश्वराला कौल प्रसाद घेतात. सोमवारी दुपारी देवदिवाळीला सर्व मानकरी, कमेटीदार मंदिरात जमून रामेश्वराला गावपळणीचा कौल प्रसाद घेतला गेला. या वेळी उत्सुकतेपोटी ग्रामस्थांनीही मंदिरात गर्दी केली होती. या वर्षी गावपळण व्हावी म्हणून ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काही काळाच्या प्रतीक्षेनंतर गावपळण होण्याबाबत रामेश्वराचा कौल प्रसाद झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला रविवारी दुपारी गावपळणीला सुरुवात होणार आहे. गावपळणी दिवशी दुपारी तोफांच्या आणि नौबतीच्या इशाऱ्यावर आचरावासीय गाव सोडण्यास सुरुवात करतात. वेशीबाहेर उभारलेल्या राहुट्यात सहजीवनाचा आनंद घेत तीन दिवस तीन रात्री आनंदात घालवणार आहेत. चौथ्या दिवशी पुन्हा गावभरण्याचा कौल घेऊन गाव भरला जाणार आहे. सर्व धर्मीयांचा रहिवास असलेल्या आचरे गावात गावपळणीची ही प्रथा खूप पूर्वीपासून सुरू आहे. गावपळण अनुभवण्यासाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. या अगोदर 12 डिसेंबर 2019 ला गावपळण झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;