कुडाळमधील बैठकीत वैभव नाईक झाले भावुक! मतदारसंघातील लोकांसाठी सदैव तत्पर राहणार – वैभव नाईक

कुडाळमधील बैठकीत वैभव नाईक झाले भावुक! मतदारसंघातील लोकांसाठी सदैव तत्पर राहणार – वैभव नाईक

मालवण विधानसभा मतदारसंघात आपला जो पराभव झाला तो पराभव मी स्विकारला आहे. आमदार असताना मी गेल्या दहा वर्षात सर्व सामान्य माणसासाठी काम केले. मी आता आमदार नाही त्यामुळे मला आमदार न म्हणता मला माझ्या नावाने हाक मारा. माझी आमदारकी ही लोकांसाठी होती आणि यापुढे सुद्धा लोकांसाठीच सदैव तत्पर राहणार आहे, असे सांगत जनता व कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक भर बैठकीत भावुक झाले.

या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी-कार्यकत्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना आम्ही तुमच्यासोबत राहून काम करू अशी ग्वाही दिली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सोमवारी कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

यावेळी जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, महिला पदाधिकारी यांसह सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत माझ्या पराभवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील जनता हळहळ व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर आरोप करत फेर मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र मी तसे केले नाही माझा पराभव मी स्वीकारला असून त्याविषयी कोणाला दोष देणार नाही, असे वैभव नाईक यावेळी म्हणाले.

माझ्यावर 73 हजार मतदारांनी विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात मी काम करत राहणार आहे. माझ्या विरोधात निवडून आलेल्या उमेदवाराला मी तेव्हाच शुभेच्छा दिल्या. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी विकास कामे करून दाखवावीत. हे करत असताना सत्ताधारी आणि अधिकारी यांनी एक लक्षात ठेवावे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून कामे केल्यास आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास त्याला आमचा विरोध राहील.

हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास आम्ही कमी पडणार नाही. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे. संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवटपर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. आमदार असताना मी गेल्या दहा वर्षात सर्व सामान्य माणसासाठी काम केले. माझ्याबरोबर काही लोक शेवटपर्यंत थांबतील तर काही लोक साथ सोडतील मात्र शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत काम करण्याचा निश्चय मी केला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात काम करायचे आहे. सत्ताधारी ज्या ज्या वेळी चुकतील त्या त्या वेळी आपण आवाज उठवला पाहिजे. लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आता विकास कामांची जबाबदारी आपल्यावर नसली तरी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी शिवसैनिकांची साथ येणाऱ्या काळात मला लागणार आहे आणि सर्व शिवसैनिक मला साथ देतील, असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. आता नव्या जोमान सर्वांनी कामाला लागूया. लोकांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित काम करुया अशी ग्वाही वैभव नाईक यांनी उपस्थित पदाधिकारी-कार्यकत्यांना दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;