गोविंदाच्या सुनेचे 14 वेळा गर्भधारणेचे प्रयत्न ठरले अपयशी; ट्रोलिंगवर म्हणाली..
कॉमेडियन कृष्णा शाहची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाह 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई बनली. या दोघांना जुळी मुलं झाली. मात्र आई बनण्याचा कश्मीराचा प्रवास काही सोपा नव्हता. एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होतं. कारण मी नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकत नव्हती. माझी प्रकृती ठीक नव्हती. IVF प्रोसेसदरम्यान माझ्या शरीरावर खूप परिणाम झाला होता", असं तिने सांगितलं.
गर्भधारणेत मी 14 वेळा अपयशी ठरले होते. IVF इंजेक्शन्समुळे सतत मूड स्विंग्स व्हायचे. माझं वजनही खूप वाढलं होतं. मी खूप त्रस्त झाले होते. माझं वाढलेलं वजन कमी करणंही खूप आव्हानात्मक होतं. कारण ते सर्व नैसर्गिक नव्हतं", अशा शब्दांत कश्मीराने अनुभव सांगितला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List