मी गेल्यानंतर…; ‘त्या’ रेकॉर्डिंग्सबद्दल नाना पाटेकर यांचा मोठा खुलासा

मी गेल्यानंतर…; ‘त्या’ रेकॉर्डिंग्सबद्दल नाना पाटेकर यांचा मोठा खुलासा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेक सामाजिक आणि वैयक्तिक बाबींवर ते उघडपणे बोलताना दिसतात. एका मुलाखती दरम्यान नाना पाटेकर यांनी काही व्हीडिओ रेकॉर्डिंगबाबतचा खुलासा केला आहे. नाना पाटेकर यांच्या घरात कॅमेरा सेटअप आहे. जेव्हा मनाला काही गोष्टी चांगल्या वाटतात किंवा खुपतात तेव्हा ते या कॅमेरा समोर बसून मनातील भावना बोलतात. असे अनेक व्हीडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. याबाबत नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

व्हीडिओ रेकॉर्डिंगबाबत नाना पाटेकर काय म्हणाले?

मला सगळे म्हणतात की तुम्ही आत्मचरित्र का नाही लिहीत? म्हटलं मला आत्मरित्र लिहायला नाही आवडत. मला काय वाटतं त्या संदर्भामध्ये मी बोलत राहीन. त्यामुळे घरात मी तीन कॅमेराचा सेटअप केला आहे. त्याचं लायटिंग वगैरे फिक्स करून ठेवलं आहे. ज्या क्षणाला मला काहीतरी बोलायचं असतं. मनात उर्मी येते. तेव्हा मी कॅमेरा ऑन करतो आणि त्या कॅमेरा समोक बोलतो. मी माझ्या मुलाला मल्हारला म्हटलं आहे की, मी गेल्यानंतर ते सगळं जर कुणाला दाखवायचं असेल तर ते दाखवा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

मी कुणाच्या विरोधात किंवा कुणाच्या बाजूने वगैरे बोलत नाही. मला जे पटतं त्याला मी छान म्हणतो. टाळ्या वाजवतो. नाही पटलं तर मी त्यांना विचारतो की हे असं का? त्यामुळे ते कुठल्या पक्षाचं नाहीये, असंही नाना पाटेकर यांनी सांगितलं आहे.

नाना पाटेकर यांनी त्या व्हीडिओंबद्दल बोलत असताना नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम आवडत असल्याचं नाना पाटेकर यांनी याच मुलाखतीत सांगितलं. पण सध्या मला नरेंद्र मोदी यांचं काम प्रचंड आवडत आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत. पण ज्या क्षणी मला वाटेल, त्यांच्या काही गोष्टी नाही आवडणार तेव्हा मी त्यांना बोलेन, असं नाना पाटेकरांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;