करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा प्रेमात; ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत रोमँटिक मालदिव व्हेकेशनवर

करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा प्रेमात; ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत रोमँटिक मालदिव व्हेकेशनवर

चित्रपटसृष्टीत एकाच प्रोजेक्टमध्ये काम करताना अनेकदा कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र त्या प्रत्येकाचं नातं टिकेलच असं नाही. काहींचं नातं लग्नापर्यंत जाऊन पोहोचतं, तर काहींचं नातं अवघे काही वर्षंच टिकतं. काही सेलिब्रिटी असेही पहायला मिळतात, ज्यांना इंडस्ट्रीतच दुसऱ्यांदा प्रेम मिळतं. असंच काहीसं अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत घडलंय. अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट अनुषा पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. टीव्ही अभिनेता करण कुंद्राशी ब्रेकअपनंतर बऱ्याच वर्षांनी तिच्या आयुष्यात प्रेम परतलंय. अनुषा ज्या मराठी अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे, तो दुसरा-तिसरा कोणी नसून भूषण प्रधान आहे. नुकतेच हे दोघं मालदिवला फिरायला गेले आहेत. या रोमँटिक व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भूषण प्रधानसोबत अनेकदा अनुषाला पाहिलं गेलंय. नुकतेच काही मराठी कलाकार अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या अलिबागच्या घरी फिरायला गेले होते. यावेळी भूषणसोबत अनुषासुद्धा आवर्जून उपस्थित होती. इतरही काही कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. आता अनुषाने मालदिव व्हेकेशनचे फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांना या दोघांची जोडी खूपच आवडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@anushadandekar)

अनुषा आणि भूषणने ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. चित्रपटाच्या प्रमोशननंतर विविध कार्यक्रमांमध्ये आणि एकमेकांच्या फॅमिली फंक्शन्सलाही दोघं एकत्र झळकले होते. भूषणच्या वाढदिवसानिमित्त अनुषाने खास पोस्टसुद्धा लिहिली होती. या पोस्टच्या अखेरीस तिने ‘लव्ह यू’ असं म्हटलं होतं.

भूषणला डेट करण्याआधी अनुषा ही अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ब्रेकअपनंतर तिने करणवर फसवणुकीचा आरोप केला होता. लॉकडाऊनदरम्यान या दोघांचे मार्ग वेगळे झाले. अनुषासोबत ब्रेकअपनंतर करण आता त्याच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला डेट करतोय. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं सोबत आहेत. बिग बॉसच्या घरात या दोघांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;