कुणकेश्वरातून पहिली पेटी रवाना, देवगड हापूस 2500 रुपये डझन

कुणकेश्वरातून पहिली पेटी रवाना, देवगड हापूस 2500 रुपये डझन

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरची वाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेटय़ा सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या असून या पाठविलेल्या देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला 2500 इतका दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामानात सातत्याने वारंवार होणारा बदलामुळे चांगल्या पद्धतीने आंबा पीक घेणे आज शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च केला जातो आणि यामध्येच हापूस आंबा पीक घेणे व ते टिकवणे हे खूप कठीण बनत चालले आहे. अशातच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासून मोहोर येऊ लागला होता. हवामानाच्या बदलामुळे हा मोहोर गळूनदेखील बऱयाच वेळा पडला. मात्र आलेला मोहोर टिकवण्यासाठी या दोन बंधूंची धडपड होती यात त्यांना यशही आले. त्यांनी आपल्या बागेतील मोहोर टिकावा यासाठी नियोजन पद्धत कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पीक जपण्याचा प्रयत्न केला. या वर्षीच्या देवगड हापूसच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे. या वर्षी त्यांनी एक एक डझनच्या देवगड हापूसच्या दोन पेटय़ा सांगली येथील एमएबी यांच्या पेढीवर पाठविल्या असून यातील एका डझनच्या पेटीला 2500 असे दोन हापूसच्या पेटींना पाच हजार रुपये दर मिळाला असल्याचे या वेळी धुरी यांनी सांगितले. दोन महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत देवगड हापूसची मागणी वाढलेली दिसत आहे.

जागतिक तापमान काढ, पडणारी कीड तसेच बदलता हकामान यातही हापूसची चक कायम टिकून राहिलेली आहे. मात्र, ही चक आणि हापूस ग्राहकांच्या हाती जसाच्या तसा पडाका, यासाठी आंबा उत्पादकांचे कष्टही काढले आहेत. मात्र, चंद्रकात आणि राजाराम धुरी या बंधूंनी निसर्गाशी झगडून या हंगामातील पहिली पेटी दोन महिने आधीच सांगली बाजारपेठेत पाठकली आहे. त्यांच्या पेटीला मिळालेला 2500 रुपयांचा दर हा त्यांच्या कष्टाची पोचपाकतीच म्हणाकी लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;