लक्षवेधक – प्रतीक्षा ‘पुष्पा 2’ची… अॅडव्हान्स बुकिंग सुरू
‘पुष्पा 2 द रूल’ हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शनिवारपासून म्हणजेच 30 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. ‘पुष्पा’चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱया भागाची बरीच उत्सुकता आहे. ‘पुष्पा 2 द रूल’ सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून रिलीजपूर्वीच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुन-रश्मिका मंदनाचा ‘पुष्पा 2’ च्या ट्रेलरने उत्सुकता वाढली आहे.
‘वो लडकी है…’ दुआ लिपा शाहरुखच्या गाण्यावर थिरकली
आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाचा कॉन्सर्ट मुंबईत शनिवारी रंगला. बीकेसीतील एमएमआरडीए ग्राऊंडवर दुआ लिपा थिरकली. कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये दुआ लिपा शाहरुख खानच्या ‘वो लडकी है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सुरुवातीला तिने ‘लेविटेटिंग’ गाणे सादर केले आणि त्यानंतर लगेच ‘वो लडकी है’ गाण्यावर डान्स सुरू केला. दुआ लोपाचा हिंदी गाण्यावरील डान्स पाहून प्रेक्षक खूश झाले.
सणासुदीनंतर ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री घटली
दसरा, दिवाळी संपताच वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. सणासुदीचे दिवस संपताच ग्राहकांनी नवीन खरेदीस नापंसती दर्शवल्याचे दिसते. या कालावधीत कंपनीच्या नोंदणीत 33 टक्के घट झाली.
ऑक्टोबर महिन्यात 40,000 हजारहून अधिक गाडय़ांची विक्री झाली होती, जो आकडा नोव्हेंबरमध्ये 27,746 हून कमी आला.
मणिपुरी महिलांची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात
गेल्या वर्षीपासून अत्याचार, हिंसाचाराच्या घटनांमुळे मणिपूर धुमसत आहे. अशातच हातावर पोट असणाऱया येथिल महिलांच्या मदतीसाठी सिंगापूरमध्ये वास्तव्य असलेला, पण मूळचा मणिपूरचा रहिवासी असलेला उद्योजक सरसावला आहे. मणिपुरी महिलांनी पारंपरिक हस्तकलेचा वापर करून तयार केलेल्या लोकरीच्या बाहुल्यांना त्याने थेट आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवले आहे. त्यामुळे महिला स्वावलंबी होऊन त्यांच्या हाताला काम मिळाले आहे.
व्हॉट्सऍपचं अप्रतिम फिचर; थेट चॅनल गाठता येणार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍपला आणखी आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमी नवनवीन फिचर्स आणत असते. आता यात भर भडली असून, युजर्संना थेट चॅनलमध्ये सहभागी होता येणार आहे. व्हॉट्सऍपच्या एका नव्या फिचरची चाचणी केली जात आहे. क्यूआर कोड आधारित असलेल्या या फिचरमुळे वापरकर्त्यांना
स्कॅन करुन कोणतेही चॅनल थेट पाहता येईल. याशिवाय
चॅनलला शेअर करणे आणि कनेक्ट करणे अगदी सोपे होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List