पाकिस्तानातील हिंसाचार प्रकरणी इम्रान खान दोषी

पाकिस्तानातील हिंसाचार प्रकरणी इम्रान खान दोषी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 9 मे 2023 रोजी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालाने 8 प्रकरणांमध्ये इम्रान खान यांचा जामीनही रद्द केला आहे. न्यायाधीश मंजर अली गिल यांनी आपल्या लेखी निर्णयात म्हटले आहे. इम्रान खानविरोधातील हिंसाचाराशी संबंधित व्हिडीओच्या स्वरूपातील पुरावे सादर करण्यात आले आहेत. ते त्यांना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत.

कोर्टाने आपल्या निर्णयात इम्रान यांच्या विरोधात दिलेल्या साक्षींचाही हवाला दिला आहे. यापैकी जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या समर्थकांना भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप होता. दरम्यान, इम्रानवरील आरोप गंभीर असल्याचे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. त्यांनी लष्करी आणि सरकारी मालमत्तांवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते. इम्रान यांच्या समर्थकांनी त्यांची आज्ञा पाळली आणि लष्करी तळ, सरकारी इमारती तसेच पोलीस अधिकऱ्यांवर हल्ले केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 9 मे नंतर पुन्हा 11 मे रोजी झालेल्या हिंसक घटना आणि पोलीस अधिकाऱ्यांवरील हल्लेही इम्रान खान यांच्या सूचनेवरून झाले. या प्रकरणात गुप्त पोलीस अधिकाऱ्यांचे रोकार्ंडग सरकारतर्फे सादर करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;