बाटनेवाले, काटनेवाले भी आप, कैसे सेफ रहेंगे! EVM विरोधातील सभेत मल्लिकार्जुन खरगेंचा आसूड

बाटनेवाले, काटनेवाले भी आप, कैसे सेफ रहेंगे! EVM विरोधातील सभेत मल्लिकार्जुन खरगेंचा आसूड

राजधानी दिल्लीत रामलीला मैदानावर ‘Boycott EVM’ रॅली झाली. या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दीड लाखांहून अधिकजण या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. त्यांनी रॅलीला संबोधित करताना मोदी सरकारवर हल्ला चढवला. भाजपवाले म्हणतात, ‘एक है, सेफ है’, पण ते कोणालाही सेफ राहू देत नाहीत. जनतेत फूट पाडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच असतात. ‘बटेंगे तो कटेंगे’ असे नारे ते देतात. मात्र फूट पाडणारे आणि कापणारेही तेच आहेत, अशा शब्दांत खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला.

आता ईव्हीएमविरोधी भावना हळूहळू क्रांतीत बदलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमची एकता तोडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ते सामान्य जनता आणि विरोधकांचा द्वेष करतात. आमचा लढा हा या द्वेषाविरुद्ध आहे. त्यासाठी राजकीय शक्ती आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. भाजप केवळ नैतिकतेबद्दल बोलतो परंतु तेच अनेकदा अनैतिक वर्तन करतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.

ईव्हीएमबाबत खरगे म्हणाले, ते ईव्हीएम वापरून तुमची मते चोरतात. ते आमदारांची चोरी करतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये हे दिसून आले आहे. ते निवडून आलेली सरकारेही चोरतात आणि तुमची पेन्शनही चोरतात. निष्पक्ष निवडणुका घ्या, मतांची चोरी करू नका. माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

भाजप देशाच्या एकात्मतेला धोका पोहचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपण एकजूट झाल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकत नाही. देशातील प्रत्येक संघटनेला संविधानाचे रक्षण करायचे आहे. आपण संविधानाचे रक्षण केले तर आपण स्वतःचे रक्षण करू शकू. संविधान हे कोणा एका व्यक्तीचे नसून सर्वांचे आहे, याच्या रक्षणासाठी देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;