दिल्लीत सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे, गोळीबार नित्याचेच आहेत; अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर निशाणा
राजधानी दिल्लीत सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. दिल्लीत गोळीबाराच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अरविंद केजरीवाल रविवारी दिल्लीतील टिळक नगर येथील कार शोरूममध्ये गेले होते. याठिकाणी जून महिन्यात खंडणीसाठी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर सिंगला स्वीट्स येथेही भेट दिली. येथे काही महिन्यांपूर्वी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. या घटना दिल्लीतील ढासळलेली कायदा सुव्यवस्था दर्शवत आहेत, असे केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज आपण टिळक नगर येथे गेलो होतो. काही दिवसांपूर्वी सिंगला स्वीट्ससमोर दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता. दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. थोड्याच अंतरावर फ्युजन कार शोरूमवर 22 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्याकडून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. गोळीबार करणारे पकडले गेले. मात्र, त्यांना ज्यांनी पाठवले होते, त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. दिल्लीने असा काळ यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. आम्हाला शांतता हवी आहे, राजकारण नाही. अमित शहा जी, दिल्लीतील जनतेला सुरक्षा द्या आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी पोस्टमध्ये केली आहे.
आज तिलक नगर गया था। वहाँ कुछ दिन पहले सिंगला स्वीट्स के सामने खुलेआम फायरिंग हुई, 2 करोड़ की फिरौती मांगी गई। वहीं थोड़ी ही दूर फ्यूज़न कार शोरूम पर 22 राउंड गोलियां चलीं। उनसे 5 करोड़ रुपए की माँग की गई। शूटर्स पकड़े गए, उन्हें भेजने वाले नहीं।
दिल्ली ने ऐसा दौर पहले कभी नहीं… pic.twitter.com/kqafi6QW3i
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 1, 2024
सध्या दिल्लीत गोळीबार नित्याचेच झाले आहेत. यावर्षी 160 खंडणीचे कॉल आले आहेत. सध्या दिल्लीत दहशतीचे वातावरण आहे. आपण अशी दिल्ली कधीच पाहिली नव्हती. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. आपल्याला शांततेत राहायचे आहे. आम्हाला राजकारण नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List