ईव्हीएमबाबत साशंकता व्यक्त; युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. बारामतीमध्ये अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात लढ झाली. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. ईव्हीएम मशीन आणि मतमोजणीवर आक्षेप घेत युगेंद्र यांनी मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
याबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतोय आणि केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला हा अधिकार दिलाय की, 5% ईव्हीएम तुम्ही चेक करू शकता किंवा 5% बूथ चेक करू शकता. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रमाच वातावरण आहे, संशयाच एक वातावरण आहे. त्याच्यामुळे जी आमची लिगल टीम आहे, जो आमचा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः आम्हाला सगळ्यांना वाटलं की चेक करायला काय हरकत आहे. तो अधिकार ही आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही ते चेक करण्याची मागणी तिथं केली आहे, असे सांगत आपण मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज केल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List