जितेंद्र आव्हाड गटनेते, रोहित पाटील मुख्य प्रतोद; राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणा

जितेंद्र आव्हाड गटनेते, रोहित पाटील मुख्य प्रतोद; राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवनिर्वाचित आमदारांची रविवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विधमंडळासाठी विधानसभेत गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली. तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची निवड करण्यात आली. तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांनी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दिली.

विधिमंडळातील विधानपरिषदेचे सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित नसल्याने विधानपरिषेदच्या नेत्याबाबत पुढीत काळात बैठग घेत त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पक्षाने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विधिमंडळाच्या विधानसभेत पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेले रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड झाली आहे. कमी वयात रोहित पाटील यांना पक्षाकडून मोठी संधी देण्यात आली आहे. तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांनी विजय मिळवला आहे. आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे. माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;