‘फेंगल’ चक्रीवादळाचा तामिळनाडूला मोठा फटका; मुसळधार पावसाने रस्ते जलमय, हवाई वाहतूक विस्कळीत

‘फेंगल’ चक्रीवादळाचा तामिळनाडूला मोठा फटका; मुसळधार पावसाने रस्ते जलमय, हवाई वाहतूक विस्कळीत

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. तेथे ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली जात आहे. चक्रीवादळामुळे कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. आता वादळ पश्चिम दक्षिणेकडे सरकणार असून त्याचा जोर ओसरणार आहे.

पुद्दुचेरीजवळील कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान हे वादळ किनारपट्टीला धडकले. वादळ पश्चिम-दक्षिण दिशेने हळूहळू पुढे सरकत राहील. त्यानंतर काही तासांत त्याचा जोर ओसरणार आहे. मात्र, या वादळाचा तामिळनाडूला मोठा फटका बसला असून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चेन्नईसह काही भागात पाणी तुंबले आहे. त्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच यामुळे चेन्नई विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे दोन धावपट्टी आणि एक टॅक्सीवे वर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. आतापर्यंत 55 उड्डाणे रद्द करण्यात आली असून 19 उड्डाणे वळवण्यात आली आहेत. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्हीही उड्डाणांचा समावेश आहे.

चेन्नईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच संवेदनशील भागात 18 आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत. चेन्नईत पाणी साठल्याने बहुतांश अम्मा कॅन्टीनमध्ये मोफत जेवण देण्यात येत आहे. सद्यस्थितीत 334 ठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा करण्यसााठी 1700 मोटर पंप युद्धपातळीवर सुरु आहेत. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;