‘फेंगल’चा राज्यावरही परिणाम होणार; काही जिल्ह्यात पावसाची शक्यता
राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या अतिशीत वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरमला धडकले. त्यामुळे त्या भागात काही ठिकाणी पाऊस झाला. या वादळाचा परिणाम राज्यावरही होणार असून काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सध्या थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला असला तरी पुढील काही दिवसांमध्ये तो स्थिर राहण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी नाशिक येथे 8.9 या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.
‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान आज धडकले. त्यामुळे त्या भागात काही ठिकाणी पाऊस झाला. राज्यातही त्याचा परिणाम होणार असून सोमवार, मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. सोमवारी सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List