सैफ अली खानचं दुसऱ्या घटस्फोटावर मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येक वेळेस घटस्फोट…’

सैफ अली खानचं दुसऱ्या घटस्फोटावर मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येक वेळेस घटस्फोट…’

Saif Ali Khan on Divorce: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1991 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोन मुलांच्या जन्मानंतर सैफ आणि अमृता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या जवळपास 13 वर्षांनंतर सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सैफ याने अमृता हिच्यावर आई शर्मिला टागोर आणि बहिणी सोहा आणि सबा यांच्यासोबत असभ्य वागणूक केल्याचे आरोप लावले.

रिपोर्टनुसार, सैफ अली खान याने अमृता हिला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून 5 कोटी रुपये दिले होते. शिवाय मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होत नाही तोपर्यंत महिन्याला 1 लाख रुपये खर्च म्हणून देईल.. असं देखील सैफ पहिला पत्नी अमृता हिला म्हणाला होता.

एवढंच नाही तर, एका मुलाखतीत सैफ याने विनोदी अंदाजात घटस्फोटावर वक्तव्य केलं होतं. सैफ म्हणाला होता, ‘एका ठराविक काळानंतर आपण प्रत्येक जण एका नात्यात अडकतो… अनेक गोष्टी बदलून जातात… प्रेमात कळत देखील नाही की, आपण दोन वेगळ्या व्यक्ती आहोत…’

‘तुम्हाला जोडीदाराच्या काही गोष्टी आवडतात आणि त्या गोष्टींचा सन्मान करता… मला तू आवडतेस आणि मला तुझ्या भोवती राहायचं आहे… कारण मी तुझ्यासारखं होऊ शकत नाही… जगात असे अनेक लोकं आहेत, जे चुकीच्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकले आहेत. पण नेहमी घटस्फोट घेणं परवडणारं नाही…’ असं देखील सैफ म्हणाला होता.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी लग्न केलं तेव्हा सैफ फक्त 21 वर्षांचा होता. अमृता आणि सैफ यांच्यामध्ये 13 वर्षांचं अंतर आहे. दोघांनी देखील गुपचूप लग्न केलं होतं. कुटुंबियांना देखील त्यांच्या लग्नाची कल्पना नव्हती.

अमृता हिला घटस्फोट दिल्यानंतर काही वर्षात सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे करीनाला हिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण आता सैफ आणि करीना आनंदी आयुष्य जगत आहे. लग्नानंतर करीना हिने तैमूर आणि जेह यांना जन्म दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;