अजूनही सरकार स्थापन होत नाही हा तर महाराष्ट्राचा अपमान, आदित्य ठाकरे यांची टीका
सगळे नियम आणि कायदे हे फक्त विरोधी पक्षांना लागू होतात असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच अजूनही सरकार स्थापन होत नाही हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
एक्सवर पोस्ट लिहून आदित्य ठाकरे म्हणाले की, निकाल लागून एक आठवडा उलटून गेला तरी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होत नाही आणि सरकार स्थापन होत नाही. हा फक्त महाराष्ट्राचा अपमान नाही तर राज्याला गृहित धरले जात आहे आणि प्रिय निवडणूक आयोगाला मदतही पुरवली जात आहे.
To not be able to decide on a chief minister, and form government, for more than a week after result day, is not just an insult to Maharashtra (for taking our state so lightly) but also to the assistance provided by their dearest Election Commission.
It seems that rules only…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 1, 2024
तसेच याचा अर्थ सगळे नियम फक्त विरोधी पक्षांना लागू होता. काही विशिष्ट लोकांना नियम कायदे लागू होत नाहीत. परस्पर शपथविधीची तारीख जाहीर करणं, राज्यपालांकडे सरकारस्थापनेचा दावा न करणे ही अराजकता आहे. आणि अशा वेळी काळजीवाहू मुख्यमंत्री सुटीवर गेले आहेत ते ही चंद्राची दशा पाहून, असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची कुठलीही हालचाल दाखवली जात नाहीये. ते लोक दिल्लीवाऱ्यांचा आनंद घेत आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागायला हवी होती ना? जर विरोधकांकडे योग्य संख्याबळ असतं तर हा निर्णय एवढा लांबणीवर गेला असता का? असो, जो कोणी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल त्यांना आमच्या शुभेच्छा आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या जनादेशाचे धन्यवाद असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List