LPG Cylinder Price Hike: महागाईचा चटका, LPG गॅस महागला

LPG Cylinder Price Hike:  महागाईचा चटका, LPG गॅस महागला

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ केली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. या दरानुसार, 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर 18 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसणार असून याची झळ सर्वसामान्यांनाही बसणार आहे. याआधी नोव्हेंबरच्या एक तारीखला सिलिंडरचा दर वाढवला होता.

डिसेंबरच्या 1 तारीखला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलांवर नजर टाकली तर 10 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि कोलकातापासून चेन्नईपर्यंत वाढल्या आहेत. 1 डिसेंबर रोजी मुंबईतील एलपीजी 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1754.50 रुपये होती, जी आता 1771 रुपये झाली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1818.50 रुपये झाली आहे, जी आतापर्यंत 1802 रुपयांना मिळत होती. हा व्यावसायिक सिलेंडर आता कोलकातामध्ये 1927 रुपयांचा जो 1 नोव्हेंबरच्या वाढीनंतर 1911.50 रुपयांना विकला जात होता. याशिवाय, आतापर्यंत हे सिलेंडर चेन्नईमध्ये 1964.50 रुपयांना मिळत होते, जे आता 1980.50 रुपये झाले आहे.

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत स्थिर

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे, मात्र 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. याच्या किमती 1 डिसेंबरलाही स्थिर ठेवण्यात आल्या आहेत आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी त्याच दरात उपलब्ध आहेत. त्याची किंमत मुंबईत 802.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये अशी कायम आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;