मिंधेंना डॉक्टरांची गरज आहे की तांत्रिकांची? संजय राऊत यांचा टोला

मिंधेंना डॉक्टरांची गरज आहे की तांत्रिकांची? संजय राऊत यांचा टोला

एकनाथ शिंदे यांची प्रकृती नाजूक आहे, पाच तारखेला शपथविधीसाठी त्यांना एअरअ‍ॅम्ब्युलन्समध्ये आणावं लागेल अशा चिंतेत काही लोक आहेत असे विधान वसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मिंधेंना डॉक्टरांची गरज आहे की तांत्रिकांची? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत, त्यांच्याबाबतीत असं वेडंवाकड बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. त्यांना मंत्री भेटायला गेले पण त्यांचीही भेट झाली नाही. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही डिस्टर्ब करू नका. पाच तारखेला शिंदे शपथवधीली येतील ना की त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून आणावं लागेल? अशा चिंतेत काही लोक आहेत. शिंदे यांना पहायला डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रात वाचलं. त्यांना डॉक्टरांनी गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे ? हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत? त्यांच्या अंगात जी भुतं संचारली आहेत ती आता उतरवायला पाहिजे. आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे असे संजय राऊत म्हणाले.

कुठलं मंत्रिपद मिळणार हे एकनाथ शिंदे नाही ठरवू शकत. हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी ठरवणार. यांच्यासमोर कुठली हाडकी टाकायची आणि चघळायचं हे शिंदे नाही ठरवणार. आधी रुसवे फुगवे आणि नंतर शरणागती या पलीकडे शिंदेंच्या हातात काही नाही. तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतला होता तो याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता. कारण आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही. आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;