“मला या घरात नाही राहायचंय..”; आलियासमोर रणबीरने शाहरुखकडे केली तक्रार, नेमकं काय घडलं?

“मला या घरात नाही राहायचंय..”; आलियासमोर रणबीरने शाहरुखकडे केली तक्रार, नेमकं काय घडलं?

अभिनेता शाहरुख खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्रिकूट एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. ‘डिअर जिंदगी’, ‘गली बॉय’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटांमधील भूमिकांचा संदर्भ घेऊन ही खास जाहिरात शूट करण्यात आली आहे. या जाहिरातीत रणबीर आणि आलियाच्या वैवाहिक आयुष्यावरून भन्नाट विनोद करण्यात आले आहेत. जवळपास एक मिनिटाच्या या जाहिरातीत शाहरुख डॉ. जहांगीर खान भूमिकेत बसून रणबीर आणि आलियाचं काऊन्सिंग करताना दिसतोय.

यावेळी शाहरुख विचारतो, “बनी, सफीना.. तुमचं वैवाहिक आयुष्य कसं सुरू आहे?” त्यावर सफीनाच्या भूमिकेतील आलिया म्हणते, “मी तुम्हाला सांगते, मी त्याला थोडा बर्फ आणायला सांगितला तर तो थेट लडाखला गेला. मी त्याला फोन करून विचारलं की, तुला इतका का वेळ लागतोय? तर तो म्हणाला ‘मी पर्वतांमध्ये रमलोय.'” यानंतर आलिया तिचा प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवते, “इतना पहाडों के साथ गुलू गुलू करेगा तो धोपटूईंगी ना इसको.”

यानंतर रणबीर त्याचा प्रसिद्ध डायलॉग म्हणतो, “डॉ. जहांगीर, मै उडना चाहता हूँ, दौडना चाहता हूँ, बस इस घर में रुकना नहीं चाहता.” हे ऐकल्यानंतर शाहरुख विचारतो, “पण का?” रणबीर तक्रार करत म्हणतो, “त्यादिवशी मी सूर्यास्त बघायला छतावर चढलो आणि ते छतच मोडलं. मला इथे सुरक्षित वाटत नाही.” यावर आलिया म्हणते, “तुला घरावर रॉक क्लाइंबिंग कोणी करायला सांगितलं?” या दोघांमधील वाद थांबवत शाहरुख सल्ला देतो, “मी तुम्हा दोघांचं ऐकून घेतलंय. माझ्याकडे तुमच्यासाठी एक उपाय आहे…” यानंतर शाहरुख ज्या प्रॉडक्टची जाहिरात आहे, त्याबद्दल सांगतो.

शाहरुख, आलिया आणि रणबीर यांच्या या जाहिरातीवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना रणबीर आणि आलियामधील मजेशीर संवाद आवडला आहे. या दोघांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, ते संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;