माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संविधानाला आणि देशाला हानी पोहोचवली, ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांचा गंभीर आरोप
जिथे भाजपची सत्ता असते तिथे हिंदु मुस्लीम दंगली होतात आणि सामाजिक सौहार्दता धोक्यात येते असे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी व्यक्त केले आहे. तसेच माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी संविधान आणि देशाला हानी पोहोचवली असेही दवे म्हणाले.
द वायर या वेबसाईटला दवे यांनी पत्रकार करण थापर यांच्यांशी बातचीत केली. उत्तर प्रदेशमध्ये संभलमध्ये जो हिंसाचार झाला त्यावर थापर आणि दवे चर्चा करत होते. तेव्हा दवे म्हणाले की, 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी जी प्रार्थनास्थळं जशी होती तसेच ठेवण्याचा कायदा आहे. पण सर्वोच्च न्यायालयात तुम्ही काय शैक्षणिक प्रयोग (academic exercises) करत आहात का? धार्मिक सौहार्दतेचा हा गंभीर मुद्दा आहे. संभलमध्ये चार निर्दोष लोकांचे प्राण गेले आणि त्यासाठी न्यायपालिका जबाबदार नाही? लोकांचे जीव जाताहेत, दोन समुदाय कायमचे विभागले जात आहेत. या जखमा कधीच भरून येणार नाहीत. जिथे जिथे भाजपचे राज्य आहे तिथे अशा घटना घडतात, मग ते राजस्थान असो वा उत्तर प्रदेश. चंद्रचूड यांनी संविधानाला आणि देशाला मोठी हानी पोहोचवली आहे असेही दवे म्हणाले. तसेच देशात अनेक कामं आहेत जी आपल्याला अजून करायची आहेत. आपल्याला 140 कोटी लोकांची काळजी घ्यायची आहे. आपल्याला नोकऱ्या वाढवायच्या आहेत, गरीबांना दारिद्र्यातून मुक्त करायचे आहे. आपल्याला सामाजिक शांतता हवी आहे असेही दवे म्हणाले.
ब्रेकिंग
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर गंभीर टीका केली:“चंद्रचूड यांनी संविधान आणि देशातील जनतेवर मोठा अन्याय केला आहे!” ✓
देशाच्या दयनीय स्थितीवर, विशेषत: अल्पसंख्याकांच्या स्थितीवर चर्चा करताना ते रडले.
हे अत्यंत… pic.twitter.com/hAjHrZeVNp
— (@AmitYji127) November 30, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List