शुभमंगल ‘सावधान’… गेल्या वर्षीच्या तुलनेत लग्नाचा खर्च 7 टक्क्यांनी वाढला; महागाई वाढल्याने भल्याभल्यांचे बजेट कोलमडले
देशात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. बँड, बाजा आणि बारात जोरदार सुरू आहे. लग्न म्हटलं की वधू आणि वराकडील मंडळी संपूर्ण हौस पूर्ण करून घेत आहेत. परंतु 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये लग्नासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. लग्नाचा खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी लग्नाचे सरासरी बजेट 36.5 लाख रुपये आहे. तर डेस्टिनेशन वेडिंगचा ऑप्शन निवडणारी मंडळी यासाठी सरासरी 51 लाख रुपये खर्च करत आहेत. 2024 मधील विवाह सोहळा गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी महाग झाले आहेत.
कॅटरिंग आणि विवाहस्थळासाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने लग्नाचा खर्च वाढला आहे. लोक सर्वात जास्त खर्च विवाहस्थळावर करत आहेत. त्यानंतर लग्नातील जेवणावर सर्वाधिक खर्च होत आहे. हिंदुस्थानातील जास्तीत जास्त कुटुंब हे कुटुंबासाठी घर खरेदी करणे आणि मुलांच्या लग्नावर सर्वात जास्त खर्च करत असतात. लग्नासाठी देशातील प्रसिद्ध हॉटेल, मंगलकार्यालये आधीच बुक करण्यात आली आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने लग्नासाठी लागणाऱ्या वाहनांना जास्त पैसे मोजावे लागतात. लग्नाच्या जेवणासाठी सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त खर्च येत आहे. लग्नासाठी लागणाऱ्या खर्चात दागिने, मेकअप, लग्नासाठी लागणारा पोशाख याच्याकरही मोठा खर्च होत आहे. हे सर्क महाग झाल्याने यासाठी आता जास्त पैसे मोजाके लागत आहेत. गॅस सिलिंडरच्या किंमतीत काढ झाल्याने याचा फटका सुद्धा किकाह सोहळ्याला बसला आहे. याकर्षी लग्नांमध्ये एकूण 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. देशात दरककर्षी साधारण एक कोटी किकाह होतात. मोठी आर्थिक उलाढाल होणारं हे सर्कांत मोठे चौथे क्षेत्र असल्याचे म्हटले जाते. लग्नामुळे अनेकांकर कर्जबाजारी होण्याची केळ आली आहे.
लग्नसराईत सोने महागले
ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 70 हजारांच्या पुढे गेला आहे. सोन्याचे दर पाहून सोने खरेदी करणाऱ्यांचे डोळे पांढरे होत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे आगामी काळात लग्नसराईवर सोन्याच्या खरेदीवर किती परिणाम होईल, हे लवकरच स्पष्ट होईल. येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढतील, अशी शक्यताही जाणकार वर्तवत आहेत.
श्रीमंताच्या लग्नाचे बजेट 1 कोटी
देशातील श्रीमंत व्यक्तीच्या लग्नाचे बजेट हे एक कोटींहून अधिक आहे. हा विवाह सोहळा डेस्टिनेशन वेडिंग म्हणून आयोजित केले जातात. निमंत्रणापासून सजावट आणि संपूर्ण आयोजन हे सर्व काही वेगवेगळ्या थीमवर आधारित असते. नवे जनरेशन कॉकटेल मिक्सिंग, गेमिंग सेशन, विवाहस्थळ यावर सर्वात जास्त खर्च करत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात जवळपास 48 लाख विवाह होणार आहेत. यातून 6 लाख कोटी रुपयांचा व्यापार होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List