शस्त्रक्रियानंतर डॉक्टरने पोटात कैची ठेवली

शस्त्रक्रियानंतर डॉक्टरने पोटात कैची ठेवली

मध्य प्रदेशातील एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात कैची तशीच राहिली. हा सर्व प्रकार दोन वर्षांनंतर उघडकीस आला आहे. भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन केल्यानंतर महिलेच्या पोटात कात्री दिसल्याने डॉक्टरांसह रुग्णाच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

कमलादेवी असे या पीडित महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून महिलेच्या पोटात कात्री राहिली. 40 वर्षीय कमलादेवी यांना गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. नवरा कमलेश आपल्या पत्नीसह ग्वाल्हेरच्या कमलराजा रुग्णालयात गेला होता. जिथे 22 फेब्रुवारी 2023 रोजी डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु, ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकून पोटात कात्री राहिली. शस्त्रक्रियेनंतर पीडित महिलेलाही ही बाब लक्षात आली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून महिलेच्या पोटात दुखत होते आणि औषधोपचार करूनही वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सिटी स्कॅन केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;