भामट्यांनी आजोबांना एक कोटींना लुबाडले; 90 वर्षीय वृद्धाची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणूक

भामट्यांनी आजोबांना एक कोटींना लुबाडले; 90 वर्षीय वृद्धाची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणूक

 ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची संख्या देशात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. डिजिटल अरेस्ट ही सायबर चोरांकडून चालवली जात आहे, असे वारंवार सांगूनही देशात असंख्य लोक याला बळी पडत आहेत. गुजरातमधील एका 90 वर्षीय वृद्धाने आयुष्यभर कष्ट करून जमवलेले 1 कोटी रुपये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीच्या माध्यमातून लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव केला होता. इतकेच नाही तर संबंधित वृद्धाला 15 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले होते. या प्रकरणी 5 जणांना अटक करत चीनमधील टोळीच्या मदतीने चालवल्या जाणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मात्र यामागील सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी पार्थ गोपानी हा कंबोडियात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अटक केलेल्या आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांचे 46 डेबिट कार्ड, 23 बँक चेक बुक, एक वाहन, वेगवेगळ्या कंपन्यांचे चार रबरी शिक्के, नऊ मोबाईल फोन आणि 28 सीम कार्ड जप्त केले आहेत. रमेश सुराणा, उमेश जिंजाला, नरेश सुराणा, राजेश देवरा आणि गौरंग राखोलिया अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी त्या वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून 1,15,00,000 रुपये ट्रान्सफर करत आर्थिक फसवणूक केली.

तुमच्या नावाने मुंबईहून चीनला पाठवण्यात आलेल्या कुरिअरमध्ये 400 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडल्याचेही ज्येष्ठ नागरिकाला सांगण्यात आले. याबरोबरच बँक खात्याच्या तपशिलानुसार तुम्ही मनी लाँडरिंगमध्ये गुंतले असल्याचा दावादेखील फसवणूक करणाऱ्याने वृद्ध व्यक्तीकडे केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;