दखल – वारीची दिव्यानुभूती

दखल – वारीची दिव्यानुभूती

>>अस्मिता प्रदीप येंडे

सावळा विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ, साऱ्या जगताची माऊली म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. याच पांडुरंगाच्या पंढरीची वारी करण्याची परंपरा अविरत सुरू आहे. आषाढी एकादशीला विविध भागांतून वारकरी पायी वारी करतात. या वारीत  वारकरी आपल्या मानसिक, शारीरिक व्यथा, वेदना विसरून अखंड हरिनामाचा जप करत वारी करतात. पंढरीची वारी केल्याने काय साध्य होते? वारी का करायला हवी? वारीचे नेमके प्रयोजन काय? या प्रश्नांची उत्तरे एका सहजसुंदर कादंबरीमध्ये सापडतात. लेखक सुनील पांडे यांनी ‘एक तरी वारी अनुभवावी’ या कादंबरीच्या माध्यमातून वारीचे विलक्षण अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ‘विठूराया आणि वारी’ हे समीकरण इतके व्यापक आहे की, जितके लिहू तितके शब्द कमी पडतील, पण लेखकाने अगदी नेमक्या आकृतिबंधात वारीचे महत्त्व आणि  प्राप्त होणारी दिव्य अनुभूती अत्यंत आध्यात्मिक तसेच व्यावहारिक दृष्टीने मांडली आहे. परमार्थ आणि ईश्वर भक्ती दोन्हीही समांतर पद्धतीने सांभाळता येतात याचे दर्शन लेखकाने घडवले आहे. माधव हा या कादंबरीचा नायक. कादंबरीची सुरुवातच होते ती  माधव पंढरपुरात पोहोचल्याची खूण घेऊन. हा वारी करणारा कादंबरीचा नायक खरे तर नास्तिक. मग तरीही असे अचानक काय होते की, परमेश्वराशी फारकत घेतलेला माधव वारी करायला तयार होतो? याच कोडय़ाचे उत्तर म्हणजे ही कादंबरी होय. आध्यात्मिक कुटुंबात जन्मलेला नास्तिक माधव जेव्हा पहिल्यांदा वारी करतो तेव्हा त्याला या वारीत विविध विचारांची, स्वभावाची माणसे भेटतात, ज्यामुळे परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक होते. वारीत त्याला सर्वधर्मसमभावाची खरी व्याख्या कळते. भजन-कीर्तन करत, हरिनामाचा जयघोष करत माणुसकीची सौंदर्यस्थळे दर्शविणारी ही वारी माणसाला कशी समृद्ध करते, हे वाचताना वाचकांनाही शब्दवारी घडते. वर्तमानातून काही काळ भूतकाळात रममाण होऊन पुन्हा वास्तवात आणणारे प्रसंग अत्यंत जिवंत चित्र होऊन डोळ्यांसमोर तरळत राहतात आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे पुस्तकाच्या प्रत्येक डाव्या पानावर चित्राच्या माध्यमातून भेटणारा पांडुरंग! वारी माणसाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपले पाय घट्ट रोवून उभे राहण्याची प्रेरणा देते.

ज्या अनपेक्षित घटनांमुळे माधवच्या जीवनात नास्तिकतेचे कुंपण तयार होते, त्या कुंपणाला भेदून आस्तिकतेचे वलय कसे निर्माण होते ही अलौकिक प्रचीती देणारी ही कादंबरी वाचनीय झाली आहे.

एक तरी वारी अनुभवावी

n लेखक ः सुनील पांडे n प्रकाशक ः सुनील पांडे n मूल्य ः 180 रू.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;