दशावतार कला जपणाऱ्यांचा आज सन्मान; भाई कलिंगण, आबा कलिंगण यांचा आज गौरव

दशावतार कला जपणाऱ्यांचा आज सन्मान; भाई कलिंगण, आबा कलिंगण यांचा आज गौरव

समाज प्रबोधनाच्या हेतूने आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱ्या माता यशोदा परिवारातर्फे उद्या, रविवारी रात्री 9 वाजता नांदोस-कट्टा येथील मधलीवाडी येथे कोकणातील दशावतार कला नाटय़ संस्कृती अविरतपणे जपणाऱ्या श्री कलेश्वर दशावतार नाटय़ मंडळ, नेरूर या संस्थेचा तसेच या संस्थेचे संचालक भाई कलिंगण आणि निर्माते आबा कलिंगण यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन व सिंधुदुर्गचे सिव्हील सर्जन  डॉ. श्रीपाद पाटील, नांदोसच्या सरपंच माधुरी चव्हाण, उपसरपंच विजय निकम, सेवांगण ट्रस्टचे दीपक भोगटे यांच्या उपस्थितीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याची माहिती माता यशोदाचे प्रमुख व स्तंभलेखक श्रीकृष्ण हरचांदे यांनी दिली. यावेळी कोकणातील भजन संस्कृती जपणाऱ्या महापुरुष प्रासादिक भजन मंडळ नांदोस-चव्हाणवाडी, श्री अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळ नांदोस-मधलीवाडी, श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ नांदोस-टेंबवाडी, बालमित्र प्रासादिक भजन मंडळ नांदोस-सारंगवाडी यांचाही स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;