अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवनगौरव
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांचा नुकताच ‘नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. साईदिशा प्रतिष्ठान आणि इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. बालगंधर्व स्मारक समितीचे संस्थापक खजिनदार आणि साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माने व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. यंदाही या सोहळय़ाचे आयोजन शुक्रवारी विलेपार्ले पूर्व येथील मुकेश पटेल सभागृह, एनएमएसआयएस विद्यापीठ येथे करण्यात आले होते. या सोहळय़ात अभिनेते सयाजी शिंदे, गायक शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत यांना ‘नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्कार’ तर गायिका पिहू शर्मा आणि गायक अंगद राज यांना ‘रायझिंग स्टार अॅवॉर्ड पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि गायक सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List