तपासाला सहकार्य करतोय, बायकोवर शिंतोडे उडवू नका, राज कुंद्राचे माध्यमांना आवाहन; सत्य नक्की समोर येईल
मी तपासाला संपूर्ण सहकार्य करतोय, पण माझी पत्नी व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव या प्रकरणात ओढू नका, असे आवाहन उद्योजक राज कुंद्राने माध्यमांना केले आहे. पोर्नोग्राफी नेटवर्कसंदर्भात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) कुंद्रा व त्याच्या संबंधित व्यक्तींच्या घरी शुक्रवारी धाडी टाकल्या. त्यानंतर कुंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करत माध्यमांबाबत खंत व्यक्त केली.
माझी पत्नी शिल्पा शेट्टीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तरीही तिचे नाव वारंवार यात ओढले जाते. तेव्हा मर्यादा ओलांडू नका, अशी विनंती कुंद्राने त्याच्या पोस्टमध्ये केली आहे. शिल्पा शेट्टीचा या गुह्याशी व धाड सत्राशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे अभिनेत्रीच्या वकिलाने स्पष्ट केले.
माध्यमांना बहुतेक एखाद्या नाटकाची चणचण भासत आहे. पोर्नोग्राफी, ईडी व सहकाऱयांनी केलेल्या दाव्यांवर केवळ एवढेच सांगतो की, सनसाटीचे कोणतेही ढग सत्य लपवू शकणार नाहीत. सत्य नक्की समोर येईल. गेली चार वर्षे सुरू असलेल्या तपासाला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे, असे कुंद्राने पोस्टमध्ये म्हटले आहे.
पॉर्न फिल्म विकून कोटय़वधी रुपये कमवल्याचा कुंद्रावर आरोप आहे. या गुह्यात 2021 मध्ये कुंद्राला अटक झाली. नंतर त्याला जामीनही मंजूर झाला. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List